बीएनए ने वाढवली पाकिस्तानी लष्कराची डोकेदुखी

20 जानेवारी रोजी लाहोरमधील अनारकली बाजार येथे झालेल्या स्फोटात किमान दोन जण ठार तर 26 जण जखमी झाले होते. बीएनएने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.
Baloch National Army
Baloch National ArmyDainik Gomantak

पाकिस्तान मध्ये बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करणारे गट पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. युनायटेड बलूच आर्मी (UBA) आणि बलुचिस्तान रिपब्लिकन आर्मी (BRA) या दोन बलूच फुटीरतावादी संघटनांमुळे नव्या बलूच नॅशनल आर्मीची (BNA) स्थापना झाली आहे, असे इंटरनॅशनल फोरम फॉर राइट्स अँड सिक्युरिटीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. बीएनएला पाकिस्तानातील (Pakistan) असंतुष्ट बलुच लोकांचा पाठिंबा मिळत आहे.(Baloch National Army)

Baloch National Army
स्वीडनमध्ये कावळे गोळा करणार सिगारेटचे तुकडे, जाणून घ्या काय आहे हा प्रकल्प

कोण चालवतात बलोच राष्ट्रीय सेना?

अहवालात असे सुचविण्यात आले आहे की, नव्याने स्थापन झालेल्या बीएनए हे बलुचिस्तानच्या दोन सर्वात मोठ्या जमातींचे मारी आणि बुगतीबरोबर एकत्र येण्याचे हे प्रतीक आहे. यूबीएचे नेतृत्व बलुच विचारवंत खैर बख्श मारी यांचा मुलगा मेहरान मारी यांच्याकडे असून बलूच सरदार अकबर बुगती यांचा मुलगा ब्रह्मदग बुगती हे 'बीआरए'चे प्रमुख आहेत. मात्र, मारी आणि बुगती समुदायाचे सदस्य बलुचिस्तान लिबरेशन आर्मीसह अनेक गटांशीही संबंधित आहेत.

बलुच बंडखोरांनी केलेले अलीकडच्या काळातील हल्ले

अलीकडच्या काळात बलुच बंडखोरांनी अनेक हल्ले केले आहेत. 20 जानेवारी रोजी लाहोरमधील अनारकली बाजार येथे झालेल्या स्फोटात किमान दोन जण ठार तर 26 जण जखमी झाले होते. बीएनएने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. याआधी 24 डिसेंबर 2021 रोजी बलुचिस्तानमधील (Balochistan ) केच जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या चेक पोस्टवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले होते.

Baloch National Army
'फेसबुकचा उदय' मार्क झुकेरबर्गने बदलला सोशल मीडियाचा अंदाज

बलुच लोकांवर पाकिस्तान सरकार अत्याचार करत आहे का?

बलुचिस्तानातील नागरिकांना द्वैताची वागणूक दिल्याचा आरोप पाकिस्तान सरकारवर करण्यात आला आहे. बलुच लोकांवर मोठ्या प्रमाणावर देशद्रोहाचा आरोप करण्यात आला असून त्यांना दहशतवादी संबोधून चकमकीत ठार करण्यात आले आहे.

इंटरनॅशनल फोरम फॉर राइट्स अँड सिक्युरिटीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे की, बलुचिस्तानमधील स्वतंत्र पत्रकार, डॉक्टर आणि नागरी हक्क कार्यकर्त्यांना अनेकदा अधिकाऱ्यांकडून लक्ष्य केले जाते. त्याचबरोबर बलुच बंडखोरांच्या सहानुभूतीदारांनाही अनिश्चित काळासाठी तुरुंगात डांबले जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com