लंडन: सौरऊर्जेसाठी (Solar Energy) भारताचे (India) प्रयत्न हे संपूर्ण जगासाठी एक उदाहरण आहे. त्याचबरोबर, झिरो-कार्बन उसर्जन भविष्याकडे वेगवान वाटचाल करण्यासाठी निसर्गावर आधारित आणि तंत्रज्ञानाद्वारे चालविलेल्या उपायांच्या जागतिक शोधामध्ये भारताची महत्त्वपूर्ण भूमिका आहे, असे मत ब्रिटनचे (Britain) प्रिन्स चार्ल्स (Prince Charles) यांनी व्यक्त केले. (Prince Charles said India's efforts for solar energy are an example to the world)
ब्रिटिश सिंहासनाचे 72 वर्षीय वारसदार आणि पर्यावरणीय कार्यकर्ता चार्ल्स यांनी ‘इंडिया ग्लोबल फोरम सेशन ऑन क्लायमेट अॅक्शन’ येथे आपल्या खास भाषणात भारतीय उद्योजक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सस्टेनेबल मार्केट्स इंडिया काउंसिल मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
हवामानासंबंधी उद्दीष्टांच्या दिशेने वेग वाढविण्यासाठी शाश्वत गुंतवणूकीच्या उद्देशाने सस्टेनेबल मार्केट्स इंडिया कौन्सिलची स्थापना केली गेली आहे. “भारताची जागतिक पातळीवरील पोहोच आणि खासगी क्षेत्राच्या बळकटीमुळे मला असे वाटते की असे काही महत्त्वाचे मार्ग आहेत जिथे आपल्याला एकत्रितपणे प्रयत्न करता येवू शकते. यासाठी आपल्याकडून होणाऱ्या प्रयत्नामुळे वेगवान आणि अधिक शाश्वत भविष्य घडवू शकतील.”असे चार्ल्स म्हणाले.
मला माहित आहे की अक्षय ऊर्जा, विशेषत: सौर ऊर्जा, वेगाने वेगाने एक आधार तयार होत आहे. आणि उर्वरित जगासाठी हे एक उदाहरण आहे." इंडिया इंक ग्रुपने ही दोन दिवसीय परिषद (30 जून ते 1 जुलै) दरम्यान आयोजित केली आहे. इंडिया इंक ग्रुप ही लंडनमधील मीडिया कंपनी आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.