China Crime News: 25 विद्यार्थ्यांना विष देणाऱ्या महिला शिक्षिकेला फाशीची शिक्षा, 1 मुलाचा मृत्यू

China Crime News: मध्य चीनमधील एका न्यायालयाने शुक्रवारी एका महिला शिक्षिकेला फाशीची शिक्षा सुनावली, जिने तिच्या 25 विद्यार्थ्यांना विष दिले.
Crime
CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

China Crime News: मध्य चीनमधील एका न्यायालयाने शुक्रवारी एका महिला शिक्षिकेला फाशीची शिक्षा सुनावली, जिने तिच्या 25 विद्यार्थ्यांना विष दिले. या घटनेत एका मुलाचा मृत्यू झाला होता.

जिओझुओ शहरातील हेनान प्रांतातील क्रमांक 1 इंटरमीडिएट कोर्टाच्या बाहेर चिकटवलेल्या पोस्टरमध्ये सांगण्यात आले की, वांग युनला गुरुवारी फाशी देण्यात आली. या भयानक घटनेने संपूर्ण चीन हादरला. यापूर्वी वांग यांचे अपील न्यायालयाने (Court) फेटाळले होते.

नोटीसनुसार, 40 वर्षीय वांगला 27 मार्च 2019 रोजी मेंगमेंग प्री-स्कूल एज्युकेशनमध्ये मुलांना दिल्या जाणार्‍या दलियामध्ये विषारी सोडियम नायट्रेट मिसळल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले होते, 'विद्यार्थ्यांचे व्यवस्थापन' यावरुन एका सहकाऱ्यासोबत झालेल्या वादानंतर.

नोटीसनुसार, एक मूल वगळता, इतर विद्यार्थी (Student) त्वरीत बरे झाले परंतु 10 महिन्यांच्या उपचारानंतर, एका मुलाचे अवयव निकामी झाल्याने मृत्यू झाला.

फक्त हायस्कूल (दहावी इयत्ता) पर्यंत शिकलेल्या वांगने दोन वर्षांपूर्वी ऑनलाईन विकत घेतलेले विष तिने तिच्या पतीला दिले होते.

Crime
China Knife Attack: चीनमधील बालवाडीत रक्तरंजीत थरार; तीन मुलांसह सहा जणांची चाकूने वार करून हत्या

नोटीसमध्ये पुढे म्हटले की, वांगचा हेतू अस्पष्ट होता. तिला तिच्या पती आणि मुलांना मारायचे आहे की, त्यांना आजारी पाडायचे आहे हे स्पष्ट नाही.

नोटीसनुसार, तिला (वांग) सुरुवातीला हानी पोहोचवल्याबद्दल नऊ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती, परंतु नंतर ही शिक्षा मृत्यूमध्ये बदलण्यात आली. वांगचे अपील न्यायालयाने फेटाळून लावले आणि तिला फाशी देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com