चीन-तैवान वादात अमेरिकेची उडी,बायडन म्हणाले...

चीन आणि तैवानमधील वाढत्या तणावादरम्यान, आता अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी याबाबतीत मोठं विधान केलं आहे.
China-Taiwan dispute Joe Biden says USA with Taiwan
China-Taiwan dispute Joe Biden says USA with TaiwanDainik Gomantak
Published on
Updated on

चीन (China) आणि तैवानमधील (Taiwan) वाढत्या तणावादरम्यान, आता अमेरिकेचे (America) अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी याबाबतीत मोठं विधान केलं आहे. बायडन यांनी अमेरिका तैवानचा चीनपासून बचाव करण्यासाठी कटिबद्ध आहे.असे सांगत अमेरिका तैवानच्या संरक्षणासाठी येईल आणि त्याचे संरक्षण करण्यासाठी अमेरिका वचनबद्ध आहे. उल्लेखनीय म्हणजे, तैवान स्वतःला एक स्वतंत्र राष्ट्र मानतो, तर चीनने नेहमीच त्याला स्वतःचा स्वायत्त भाग म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. (China-Taiwan dispute Joe Biden says USA with Taiwan)

अमेरिका तैवानमध्ये लष्करी प्रशिक्षकांच्या छोट्या तुकडीसह कमीतकमी एक वर्षापासून गुप्तपणे आपल्या सैन्य दलांना प्रशिक्षण देत आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका मीडिया रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. चीनशी शत्रुत्व पाहता अमेरिकेचे हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

बीजिंग युद्धनौकांनी केलेल्या अनेक दिवसांच्या घुसखोरीनंतर जर चीनने बेटाचा ताबा घेतला तर "प्रादेशिक शांततेसाठी घातक परिणाम" होतील असा इशारा तैवानने दिला आहे. तैवानचे राष्ट्रपती त्साई इंग-वेन यांनी स्पष्ट केले आहे की तैवान स्वतःचे संरक्षण करण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्यासाठी सज्ज आहे.

China-Taiwan dispute Joe Biden says USA with Taiwan
पाकिस्तानच आता दहशतवाद्यांच्या टार्गेटवर, हल्ल्यात पाच पाकिस्तानी सैनिक ठार

अलिकडच्या काळात सुमारे 150 चीनी युद्धनौकांनी तैवानच्या हवाई क्षेत्राचे उल्लंघन केले होते . चिनी जेट विमान सततच तैवानच्या हवाई हद्दीवरून उड्डाण करतात, जे चिनी आक्रमकतेमध्ये वाढ म्हणून पाहिले जाते. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी स्वशासित लोकशाहीची जप्ती "अपरिहार्य" म्हटले आहे. तर दुसरीकडे 2016 मध्ये स्वतंत्र तैवान जनादेशावर निवडून आल्यापासून बीजिंग त्साईवर दबाव आणत असल्याचं तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनि सांगितले आहे.

मागील काही दिवसांपासून चीन तैवानवर सतत दबाव आणण्याचा प्रयत्न करत असताना तैवानच्या राष्ट्राध्यक्षांचे हे विधान सर्वांच्या भुवया उंच करणार आहे. किंबहुना चीन तैवानला आपला भाग मानतो. दुसरीकडे, तैवान स्वतःला एक स्वतंत्र लोकशाही देश मानतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com