पाकिस्तानच आता दहशतवाद्यांच्या टार्गेटवर, हल्ल्यात पाच पाकिस्तानी सैनिक ठार

खैबर पख्तूनख्वामध्ये बुधवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये पाच पाकिस्तानी सैनिक (Pakistan ) ठार झाले आहेत .
5 Pakistani Soldier killed in terrorist attack in Pakistan
5 Pakistani Soldier killed in terrorist attack in PakistanDainik Gomantak
Published on
Updated on

खैबर पख्तूनख्वामध्ये (Khyber Pakhtunkhwa) बुधवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये पाच पाकिस्तानी सैनिक (Pakistan ) ठार झाले आहेत . एका पाकिस्तनी वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार पाक-अफगाणिस्तान (Pakistan Afghanistan Border) सीमेजवळील मामुंद तहसीलच्या डोंगराळ भागात सुरक्षा दलांच्या रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या एका वाहनाला बॉम्बस्फोटात टार्गेट करण्यात आले आहे ज्यात चार सैनिक ठार झाले आहेत .त्याचवेळी उत्तर वजीरिस्तानमधील छपरी वजीरान चेकपोस्टवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Terrorist Attack) लष्कराचा एक जवान शहीद झाला आहे. (5 Pakistani Soldier killed in terrorist attack in Pakistan)

या दोन दहशतवादी हल्ल्यांने दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानलाच गोंधळात टाकले आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र DAN ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, पाक-अफगाण सीमेजवळील मामुंद तहसीलच्या डोंगराळ भागात टायर बांदा येथे रस्त्याच्या कडेला बॉम्बस्फोट झाला, जेव्हा सुरक्षा दल आणि पोलिसांची संयुक्त टीम एक शोध मोहीम राबवत होती त्यावेळी परिसरात स्फोट करत लष्कराच्या एका वाहनाला लक्ष्य करण्यात आले.

या घटनेनंतर उत्तर वझिरिस्तानच्या हंगू भागात छपरी वजीरान चेकपोस्टवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात लष्कराचा एक जवान शहीद झाला आहे.अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारलेली नाही. सहसा तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या जवानांना लक्ष्य करत आहे. यापूर्वी त्यांनी पाकिस्तान सरकारला इशारा देखील दिला होता.

5 Pakistani Soldier killed in terrorist attack in Pakistan
पाकिस्तानमध्ये आढळला कोरोनाचा 'कॅलिफोर्निया व्हेरिएंट'!

रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओ संदेशात पाकिस्तानला इशारा देताना तालिबान प्रमुख नूर वली मेहसूद यांनी यापूर्वीच सांगितले होते की, जर पाकिस्तानी सुरक्षा दलाने तत्यांच्या विरोधातले ऑपरेशन थांबवले नाहीत तर ते सर्व आदिवासी भाग पाकिस्तानातून मुक्त करतील. या अगोदर जुलै ते 15 सप्टेंबर दरम्यान टीटीपीने पाकिस्तानी सैन्यावर 55 हल्ले केले आहेत. ते म्हणतात की, पाकिस्तान लष्कर हा वसाहतीचा वारसा आहे जो सहन केला जाऊ शकत नाही.

दरम्यान यापूर्वीच तालिबानने स्पष्ट केले होते की तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान ही त्यांची समस्या नाही. पाकिस्तानलाच त्याला सामोरे जावे लागेल. सप्टेंबरमध्ये न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या 76 व्या सत्राला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील पाकिस्तानला याबाबत इशारे दिले होते की , जो देश दहशतवादाला साधन म्हणून वापरत आहे ते विसरत आहेत की दहशतवाद त्यांनाही धोका बनेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com