चार कोटींच्या विमा रकमेसाठी मित्राची हत्या; अपघताचा केला बनाव, केस दाखल झाली अन् सर्व प्रकार आला समोर

मृत सुखजीत याची पत्नी जीवनदीप कौर यांनी सुखजीत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्यावर हा सगळा प्रकार उघडकीस आला.
Punjab Police
Punjab PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

पंजाबमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यावसायिकाचे व्यवसायात नुकसान झाल्यामुळे त्याने 4 कोटी रुपयांच्या अपघाती विम्यासाठी मित्राची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. व्यावसायिकाने त्यासाठी त्याची पत्नी आणि इतर चार जणांच्या मृत्यूचा बनाव केला.

मृत सुखजीत याची पत्नी जीवनदीप कौर यांनी सुखजीत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्यावर हा सगळा प्रकार उघडकीस आला.

सुखजीत सिंग याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी गुरप्रीत सिंग, त्याची पत्नी खुशदीप कौर आणि अन्य चार जणांना अटक केली आहे. पंजाबच्या फतेहगढ साहिब येथील ही घटना आहे.

गुरदीप सिंग नावाच्या व्यक्तीने 4 कोटींचा अपघात विम्याची रक्कम मिळवण्यासाठी सुखजीत सिंग नावाच्या व्यक्तीची हत्या केली. यानंतर अपघात घडवून स्वत:चा मृत्यू दाखविण्याचा प्रयत्न केला. गुरदीपने सुखजित सिंगशी मैत्री केली, त्यानंतर त्याला अनेक दिवस मद्य दिले आणि पैसेही देत ​​राहिला.

घटनेच्या दिवशीही गुरदीपने मयत सुरजीतला दारूमध्ये औषध मिसळून पाजले होते. यानंतर बेशुद्धावस्थेत त्याला राजपुरा येथे नेऊन ट्रकने चिरडले.

Punjab Police
कसला डिजिटल इंडिया? दाबोळीवरील फ्री वायफाय बिनकामाचे; प्रवाशाचे ते ट्विट अन् विमानतळाने शेअर केले पेड प्लॅन

हत्येनंतर गुरदीपने स्वत:च्या अपघाताची केस केली आणि त्याच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

19 जून रोजी गुरप्रीत सिंग, त्याची पत्नी खुशदीप कौर, मित्र सुखविंदर सिंग एकत्र दिसले होते. जेव्हा तपास पुढे गेला तेव्हा असे आढळून आले की 20 जून रोजी गुरप्रीत सिंगचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचा दावा करून राजपुरा पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुरप्रीतचा मित्र राजेश कुमार शर्मा विमा करायचा, त्याच्याकडून गुरप्रीतने 4 कोटींचा अपघात विमा काढला होता. मृत्यू प्रमाणपत्र आणि शवविच्छेदन अहवालाच्या आधारे वारसांना संपूर्ण रक्कम मिळेल, असे राजेशने सांगितले होते. यानंतर गुरप्रीतचा मित्र आणि या संपूर्ण प्रकरणाचा मास्टर माईंड सुखविंदर सिंग याने संपूर्ण योजना आखली आणि सुखजीत सिंगच्या हत्येचा कट रचला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com