CPEC Project: भारतासाठी धोक्याची घंटा! सीपेक प्रोजेक्टचा अफगाणिस्तानपर्यंत होणार विस्तार; चीनच्या झाशात अडकला तालिबान

CPEC Project Expansion: चीनची विस्तारवादी निती अवघ्या जगाला सर्वश्रुत आहे. दक्षिण आशियात भारताला घेरण्यासाठी चीन शेजारील देशांना कर्ज देत विविध करार करुन आपल्या जाळ्यात अडकवत आहे.
CPEC Project
CPEC ProjectDainik Gomantak
Published on
Updated on

चीनची विस्तारवादी निती अवघ्या जगाला सर्वश्रुत आहे. दक्षिण आशियात भारताला घेरण्यासाठी चीन शेजारील देशांना कर्ज देत विविध करार करुन आपल्या जाळ्यात अडकवत आहे. यातच आता, एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. चीन, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या शीर्ष नेत्यांनी त्रिपक्षीय सहकार्य वाढवण्यावर आणि चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (CPEC) अफगाणिस्तानपर्यंत विस्तारित करण्यास सहमती दर्शवली आहे. पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक दार, चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी आणि अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्यातील अनौपचारिक त्रिपक्षीय बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली.

पाकिस्तानचे (Pakistan) परराष्ट्र मंत्री इशाक दार हे तीन दिवसांच्या बीजिंग दौऱ्यावर आहेत. पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी छावण्यांवर भारताने केलेल्या कारवाईनंतर इशाक दार यांचा हा पहिलाच उच्चस्तरीय दौरा आहे. बैठकीत तिन्ही परराष्ट्र मंत्र्यांनी प्रादेशिक सुरक्षा आणि आर्थिक संपर्क वाढवण्यासाठी त्रिपक्षीय सहकार्य महत्त्वाचे असल्याचे म्हटले.

CPEC Project
Action On China - Turkey: भारताचा चीन आणि तुर्कीवर डिजिटल स्ट्राईक; ग्लोबल टाईम्स अकाउंट बंद

काय म्हणाले पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री?

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी चीन आणि अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबतच्या त्यांच्या भेटीचा फोटो शेअर केला. त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, "पाकिस्तान, चीन आणि अफगाणिस्तान प्रादेशिक शांतता, स्थिरता आणि विकासासाठी एकत्र आले आहेत." त्यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, "तिन्ही नेत्यांनी राजनैतिक संबंध, तिन्ही देशांमधील संवाद वाढवणे आणि व्यापार, पायाभूत सुविधा आणि विकासाकडे वाटचाल करण्यावर चर्चा केली."

"बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (BRI) सहकार्य अधिक दृढ करण्यास आणि चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (CPEC) अफगाणिस्तानपर्यंत विस्तारित करण्यास त्यांनी सहमती दर्शविली," असे निवेदनात पुढे म्हटले. सहावी त्रिपक्षीय परराष्ट्र मंत्र्यांची बैठक लवकरच काबूलमध्ये होईल यावर सहमती झाली आहे, परंतु त्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही, असेही सांगण्यात आले.

CPEC Project
Regent International, China: जगातील सर्वात मोठी सोसायटी, इथे राहतात तब्बल 20 हजार कुटुंबे; आयुष्यभर...

भारताचा CPEC प्रोजेक्टला विरोध

सीपीईसी प्रकल्प सुमारे 60 अब्ज डॉलर्सचा असून हा कॉरिडॉर पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधून जात असल्याने भारताने (India) त्याला तीव्र विरोध केला आहे. भारत याला आपल्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन मानतो. असे असूनही, चीन आणि पाकिस्तान या आर्थिक कॉरिडॉरने अफगाणिस्तानला जोडण्याचा प्रयत्न करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com