डोनाल्ड ट्रम्प यांच्या एलियन फाइल्समागचं धक्कादायक सत्य आलं समोर! चिनी प्रोफेसरच्या दाव्यानं खळबळ; जगाला दिला धोक्याचा इशारा

China Nostradamus UFO Prediction: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने युएफओ आणि युएपीशी संबंधित अत्यंत गुप्त दस्तऐवज, व्हिडिओ आणि फोटो सार्वजनिक करण्यास सुरुवात केली.
China Nostradamus & Donald Trump
China Nostradamus & Donald TrumpDainik Gomantak
Published on
Updated on

China Nostradamus UFO Prediction: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने युएफओ आणि युएपीशी संबंधित अत्यंत गुप्त दस्तऐवज, व्हिडिओ आणि फोटो सार्वजनिक करण्यास सुरुवात केली. सरकारच्या या पावलामुळे जगभरात परग्रहावरील जीवसृष्टीबद्दल (Aliens) मोठी उत्सुकता निर्माण झाली असतानाच, 'चीनचे नास्त्रेदमस' म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध राजकीय विश्लेषक आणि प्रोफेसर जियांग ज्यूकिन यांनी एक अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक दावा केला.

जियांग ज्यूकिन हे त्यांच्या अचूक भविष्यवाण्यांसाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचे सत्तेत पुन्हा पुनरागमन आणि अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील मोठा संघर्ष या घडामोडींची भविष्यवाणी त्यांनी आधीच केली होती, जी तंतोतंत खरी ठरली. आता ट्रम्प सरकारने मे 2025 पासून सुरु केलेल्या या यूएफओ खुलाशांवर जियांग यांनी जगाला एका मोठ्या संकटाचा इशारा दिला. त्यांच्या मते, या संपूर्ण प्रकरणामागे एलियन्सची कोणतीही सत्यता नसून, मानवी संस्कृती पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा आणि समाजात अराजकता माजवण्याचा हा एक छुपा कट आहे.

China Nostradamus & Donald Trump
Donald Trump Tariff Cut: डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! शेती आणि औद्योगिक उपकरणांवरील आयात शुल्कात 10 टक्क्यांची कपात; डिसेंबर 2027 पर्यंत मिळणार सूट

एका विशेष मुलाखतीदरम्यान प्रोफेसर जियांग ज्यूकिन यांनी स्पष्ट केले की, यूएफओ किंवा परग्रहावरील प्रगत तंत्रज्ञानाचा दावा पूर्णपणे मूर्खपणाचा आणि निरर्थक आहे. जगात प्रत्यक्षात कोणतेही एलियन्स अस्तित्वात नाहीत, तर हा सर्व सामान्य जनतेचे लक्ष मुख्य मुद्द्यांवरुन भटकावण्याचा एक सुनियोजित डाव आहे. ट्रम्प प्रशासनाने आतापर्यंत दोन मोठ्या टप्प्यांत लष्करी तळांवर उडणारे धातूचे गोळे आणि चमकणाऱ्या गूढ वस्तूंचे सुमारे 46 व्हिडिओ जारी केले.

जियांग यांच्या मते, अशा प्रकारच्या काल्पनिक गोष्टींचा उहापोह करुन लोकांना आर्थिक टंचाई, राजकीय संघर्ष आणि समाजातील वास्तविक समस्यांपासून दूर नेले जात आहे. यामुळे लोक वास्तवाचा सामना करण्याऐवजी एका काल्पनिक जगात जगू लागतील, ज्यामुळे समाज आतून पूर्णपणे पोकळ होईल.

China Nostradamus & Donald Trump
Donald Trump: अमेरिकेत नवा वाद! जॉर्ज वॉशिंग्टन, अब्राहम लिंकन यांच्या पंक्तीत आता डोनाल्ड ट्रम्प; 'त्या' फोटोनं जगाला चक्रावलं

या मानसिकतेमुळे संपूर्ण मानवी समाज वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विभागला जात आहे, अशी चेतावणी त्यांनी दिली. आज कोणी यूएफओच्या भीतीत जगत आहे, कोणी कृत्रिम बुद्धिमत्तेला घाबरत आहे, तर कोणी सरकारी कटकारस्थानांवर विश्वास ठेवत आहे. लोक आपापल्या सोयीनुसार भीतीचे स्वतंत्र जग तयार करत असून सत्याकडे पूर्णपणे पाठ फिरवत आहेत. इतिहासाचा दाखला देत जियांग यांनी समजावून सांगितले की, जगातील मोठे साम्राज्य हे कधीही बाहेरील आक्रमणांमुळे नाही, तर अंतर्गत कलह, मानसिक थकवा आणि आपसांतील विभाजनामुळे नष्ट झाली आहेत. जेव्हा एखाद्या देशातील नागरिक वास्तविकतेला नाकारुन काल्पनिक कथांच्या मागे धावू लागतात, तेव्हा तो राष्ट्र आपोआपच कमकुवत आणि लाचार बनते.

China Nostradamus & Donald Trump
Donald Trump: "आंदोलकांना फाशी द्याल याद राखा!" ट्रम्प यांची इराणला खुली धमकी; आखाती देशांत युद्धाचे ढग गडद Watch Video

या दाव्याला पुढे नेताना त्यांनी सर्न (CERN) च्या 'लार्ज हॅड्रॉन कोलायडर' आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) सारख्या महाप्रकल्पांवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले. सरकारे केवळ विज्ञानाच्या प्रगतीसाठी किंवा छोट्या कणांचा शोध घेण्यासाठी हजारो कोटी डॉलर्स पाण्यात सोडत नसून, यामागे दुसऱ्या जगाचे (Dimensions) दरवाजे उघडण्याचा एक जुना सिद्धांत जोडलेला आहे. इतिहासापासून जगभरातील श्रीमंत आणि शक्तिशाली एलिट वर्ग हा नेहमीच मानवी बुद्धीच्या पलीकडील आणि आंतर-आयामी शक्तींवर विश्वास ठेवत आला आहे.

China Nostradamus & Donald Trump
Donald Trump: "इराणला जगाच्या नकाशावरुन पुसून टाकू!" डोनाल्ड ट्रम्प यांची खुलेआम धमकी; लवकरच पडणार युद्धाची ठिणगी? VIDEO

ट्रम्प सरकारचे हे यूएफओ खुलासे यापुढेही सुरुच राहणार आहेत, परंतु शास्त्रज्ञांच्या वैज्ञानिक वादात जियांग यांनी उपस्थित केलेले प्रश्न विचार करायला लावणारे आहेत. हा खुलासा जगाला सत्य सांगण्यासाठी आहे की समाजात अविश्वासाची दरी निर्माण करण्यासाठी, याचा शोध घेणे आता गरजेचे बनले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com