passenger created panic in the flight by clamming the terrorist present in the flight
passenger created panic in the flight by clamming the terrorist present in the flight

विमान हवेत असताना तो अचानक उठला आणि ओरडला..'विमानात दहशतवादी आहे'...

Published on

पणजी- विमानात एक दहशतवादी असल्याचा दावा करत एका प्रवाशाने खळबळ उडवून दिली. दिल्लीहून गोव्याकडे निघालेल्या विमानात हा प्रकार घडला असून पोलिसांनी विमानतळावर त्याला अटक करत चौकशीसाठी ताब्यात घेतले.      

दिल्लीहून गोव्याकडे निघालेल्या विमानातील या प्रवाशाचे नाव जिया उल हक् असे असून तो मनोरूग्ण असल्याची माहिती डाबोळी विमानतळ पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. आपण दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकातील अधिकारी असल्याचा दावा करत त्याने विमानात एक दहशतवादी प्रवास करत असल्याची माहिती देत विमानातील इतर प्रवाशांमध्ये तसेच कर्मचाऱ्यांमध्येही एकच खळबळ उडवून दिली, असे ते म्हणाले.

दरम्यान, दाबोळी विमानतळावर विमान आल्यावर  या प्रवाशाला राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे कर्मचारी तसेच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेऊन त्याला विमानतळ पोलिसांच्या हवाली केले.     

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com