भारता शेजारील तिबेट आणि शिनजियांगमध्ये चीन उभारतोय 30 एयरपोर्ट; नेमका हेतू काय?

झिंजियांग (Xinjiang) आणि तिबेट (Tibet) या दुर्गम चिनी प्रदेशांमध्ये चिनी सैनिकांची (Chinese Soldiers) हालचाल सुलभ करण्यासाठी चीनी सरकार 30 विमानतळे उभारत आहे.
Chinese Soldiers
Chinese SoldiersDainik Gomantak
Published on
Updated on

भारताच्या सीमेला लागून असलेल्या झिंजियांग (Xinjiang) आणि तिबेट (Tibet) या दुर्गम चिनी प्रदेशांमध्ये चिनी सैनिकांची (Chinese Soldiers) हालचाल सुलभ करण्यासाठी चीनी सरकार 30 विमानतळे उभारत आहे. हा भाग चीनच्या (China) वेस्टर्न थिएटर कमांड (WTC) अंतर्गत येतो. सरकारी माध्यमांच्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. यापैकी अनेक विमानतळे पूर्ण झाली असून त्यांना कार्यरतही करण्यात आले आहे. तर काही विमानतळाचे काम सुरु आहे. डब्ल्यूटीसी ही पीपल्स लिबरेशन आर्मीची (People’s Liberation Army) सर्वात मोठी लष्करी कमांड आहे. हे भारताच्या सीमेवर लक्ष ठेवते.

Chinese Soldiers
चिनी अब्जाधीशांना मागे टाकत अंबानी-अदानी यांचा आशिया खंडावर ताबा

तिबेट स्वायत्त प्रदेश (TAR) मध्ये बांधण्यात येणारे तीन नवीन विमानतळ हे लुंजे काउंटी, टिंगरी काउंटी आणि बुरंग काउंटी आहेत अशी माहिती माध्यमांनी दिली आहे. विशेष म्हणजे ही तीन्ही विमानतळे भारताच्या सीमेजवळ आहेत. 2022 च्या मध्यापर्यंत रणनितीकदृष्ट्या महत्त्वाचे विमानतळ ताशकुर्गन (Tashkurgan Airport) हे चीनी आर्मीच्या सेवेसाठी उपलब्ध होणा आहे. हे पामिर पठारावरील (Pamir plateau) झिंजियांग उईघूर स्वायत्त प्रदेश (XUAR) मधील पहिले सुपर-हाय पठार विमानतळ आहे. ताशकुर्गन विमानतळ चीनच्या पाकव्याप्त काश्मीर (PoK) आणि अफगाणिस्तानच्या (Afghanistan) सीमेजवळ आहे.

Chinese Soldiers
चिनी आर्मीने तिबेटमधील शिखरे काबीज करण्याचा सराव करत भारताला दिला इशारा

ताशकुर्गन विमानतळ महत्वाचे वाखान कॉरिडॉर जवळ असेल

ताशकुर्गन हे पीओके जवळील चीनमधील शेवटचे महत्त्वाचे शहर असून ते XUAR मधील काशगर प्रांताच्या (Kashgar prefecture) ताजिक स्वायत्त काउंटीमध्ये आहे. ते एकदा तयार झाल्यानंतर, हे नवीन विमानतळ रणनीतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण वाखान कॉरिडॉरच्या जवळ स्थित असेल. वाखान कॉरिडॉर (Wakhan Corridor) हे पीओके आणि ताजिकिस्तानला चीन आणि अफगाणिस्तानपासून वेगळे करणारे क्षेत्र आहे. TAR आणि XUAR ला चीनमधील शहरांशी जोडणाऱ्या सुमारे दोन डझन हवाई मार्गांचे या वर्षी उद्घाटन करण्यात आले आहे, असे अहवालात म्हटले आहे.

Chinese Soldiers
चीनचे दुबईत गुप्त कारागृह, उईघुर मुस्लिमांना ठेवलं जातयं कैदेत: चिनी महिलेचा दावा

चीन लष्करी वापरासाठी विमानतळ आणि रेल्वे मार्गांची बांधणी

नवीन मार्ग उभारणे आणि नवीन विमानतळांचे जलद बांधकाम अशा वेळी होत आहे, जेव्हा भारत आणि चीन (India-China Border Tensions) दरम्यान तणाव पूर्व लडाखमध्ये (Eastern Ladakh) सुरु आहे. चीन भारताच्या सीमेवर आपली उपस्थिती वाढवण्यात गुंतलेला आहे. बीजिंग (Beijing) दुर्गम भागात विमानतळ आणि रेल्वे मार्ग यासारख्या पायाभूत सुविधा उभारत असून ज्या आवश्यक असल्यास लष्करी हेतूंसाठी देखील वापरले जाऊ शकतात. चिनी सैन्याच्या अधिकृत लष्करी पोर्टलने या आठवड्यात प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले आहे की, सीमावर्ती भागातील विमानतळांच्या विकासामुळे वाहतूक अधिक सोयीस्कर होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com