नवी दिल्ली: जगातील पहिल्या 10 श्रीमंत व्यक्तींपैकी 9 जण अमेरिकेतील आहेत. याशिवाय चिनी उद्योजकाचाही यात समावेश आहे. पण भारताचे दोन प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी आणि गौतम अदानी(Gautam Adani) त्यांना तगडी टक्कर देत आहेत. ब्लूमबर्ग बिलियनिर्स इंडेक्स (Bloomberg Billionaires Index) नुसार गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 2.74 अब्ज डॉलर्सने वाढली आहे. यावेळी, जगातील श्रीमंतांच्या यादीत ते 14 व्या स्थानी आले आहेत, ज्याची संपत्ती 65.9 अब्ज डॉलर्स आहे. तर मुकेश अंबानी 13 व्या क्रमांकावर आहेत.(Indias famous businessman Mukesh Ambani and Gautam Adani are the richest people in Asia)
गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांनीही चिनी अब्जाधीश झोंग शैनशैनचा जबरदस्त पराभव केला आहे. चीनचे झोंग शैनशैन यांची सपत्ती 63.7अब्ज डॉलर्सची आहे आणि ते आता जगातील श्रीमंतांच्या यादीत 17 व्या क्रमांकावर आहे. श्रीमंत यादीत अंबानी 13 व्या आणि 14 व्या स्थानावर कायम आहेत. या दोघांच्या संपत्ती मध्ये 10.4 अब्ज डॉलर्सचा फरक आहे. झोंग यांच्या संपत्तीबद्दल सांगायचे झाले तर त्याची संपत्ती 14.6 अब्ज डॉलर्सने कमी झाली आहे. याशिवाय चीनमधील आणखी एक श्रीमंत व्यक्ती, मा हुआतेंग जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादित 21 व्या स्थानावर आहे आणि आशिया खंडात चौथ्या स्थानावर आहे. त्यांची संपत्ती 60.5 अब्ज डॉलर्स आहे.
दोन दिवसात अदानी समूहाचा प्रचंड फायदा झाला
अदानी समूहाला(Adani Group) स्थानिक शेअर बाजारामध्ये सतत चढ-उताराचा फायदा झाला आहे. सोमवारी त्यांची संपत्ती 3.31 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 24233 कोटी रुपयांनी वाढली आहे. दुसऱ्या दिवशीही त्यात वाढ झाली असून गेल्या दोन दिवसांत त्यांची संपत्ती 6.05 अब्ज डॉलर्सने वाढली आहे, ती जवळपास, 44,213 कोटी रुपयांनी वाढली आहे. 65.09 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी जगात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत १४व्या स्थानावर आहे.
मुकेश अंबानी 13 व्या स्थानावर आहेत
या अहवालानुसार मुकेश अंबानी(Mukesh Ambani) श्रीमंत यादीत 13 व्या स्थानावर आहेत आणि त्यांची एकूण मालमत्ता 76.3 अब्ज डॉलर्स आहे. मंगळवारी रिलायन्सचे शेअर्स झपाट्याने वाढून 1.12 अब्ज डॉलरवर गेले. 2020 च्या सप्टेंबरमध्ये अंबानी यांची कंपनी सर्वात जास्त लाभार्थी होती. त्या काळात रिलायन्सचे शेअर्स 2369 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले. यासह अंबानींची संपत्ती 90अब्ज डॉलर्सवर पोहचली आणि जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत ते चौथ्या क्रमांकावर होते, पण त्यानंतर शेअर कमी झाल्यामुळे अंबानी टॉप 10 मधून बाहेर झाले.
अमेरिकन उद्योजकांचे वर्चस्व
श्रीमंत यादीतील बरेच व्यापारी अमेरिकन आहेत. फेसबुकचे (Facebook) मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग(Mark Zuckerberg) 116 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह पाचव्या स्थानावर आहेत. त्याच बरोबर वॉरेन बफे (Warren Buffett) 109 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह सहाव्या क्रमांकावर आहे, अमेरिकन संगणक वैज्ञानिक आणि इंटरनेट उद्योजक लॅरी पेज(Larry Page) 104 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे, गुगलचे सह-संस्थापक सर्जेई ब्रिन(Sergey Brin) 100 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह आठव्या स्थानावर आहेत. लॅरी एलिसन 90.8 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह नवव्या स्थानी आहे. आणि अमेरिकन व्यापारी गुंतवणूकदार स्टीव्ह बाल्मर 88.1 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दहाव्या स्थानावर आहेत..
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.