China: हिंद महासागर क्षेत्रातील 19 देशांसोबत चीनची पहिली बैठक; भारताला डावलले, पाकिस्तान इन

सागरी अर्थव्यवस्था त्याची तत्त्वे आणि पद्धती व सामायिक विकास अशी या बैठकीचा विषय होता.
Xi Jinping
Xi JinpingDainik Gomantak
Published on
Updated on

चीनने या आठवड्यात हिंदी महासागर क्षेत्रातील 19 देशांसोबत बैठक घेतली. विशेष म्हणजे या बैठकीत भारत अनुपस्थित होता. या बैठकीसाठी भारताला निमंत्रित करण्यात आले नसल्याची माहिती समोर आली आहे. 21 नोव्हेंबर रोजी झालेल्या चीन-हिंद महासागर क्षेत्रीय मंच विकास सहकार्याच्या बैठकीत 19 देश सहभागी झाले होते. असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संलग्न असलेल्या चायना इंटरनॅशनल डेव्हलपमेंट कोऑपरेशन एजन्सी (सीआयडीसीए) च्या निवेदनात म्हटले आहे.

Xi Jinping
Dhoni Pandya Video: बादशाहच्या रॅपवर धोनी-पांड्याचा ठेका; दोघांचा डान्स व्हायरल

ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकित इंडोनेशिया, पाकिस्तान, म्यानमार, श्रीलंका, बांगलादेश, मालदीव, नेपाळ, अफगाणिस्तान, इराण, ओमान, दक्षिण आफ्रिका, केनिया, मोझांबिक, टांझानिया, सेशेल्स, मादागास्कर, मॉरिशस, जिबूती आणि ऑस्ट्रेलिया यासह 19 देश आणि तीन आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. सागरी अर्थव्यवस्था त्याची तत्त्वे आणि पद्धती व सामायिक विकास अशी या बैठकीचा विषय होता.

Xi Jinping
Jayanti Chauhan & Bisleri: 7,000 कोटींची बिस्लेरी चालवण्यास जयंती चौहान यांनी नकार का दिला? पाच मुद्दे

हिंद महासागर क्षेत्रात चीन आपला प्रभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी पाकिस्तान आणि श्रीलंकेसह (Pakistan And Srilanka) अनेक देशांच्या बंदरे आणि पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करत आहे. हिंद महासागर प्रदेशात भारताच्या प्रभावाविरोधात मजबूत व्यासपीठ तयार करणे चीनचे उद्दिष्ट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com