Corona in China: चीनमध्ये कोरोनाचे संकट पुन्हा नव्याने समोर

Coronavirus in China: तीन वर्षांपूर्वी चीनमध्ये कोरोनाने जसे थैमान घातले होते तसेच पुन्हा कोरोनाचा डोके वर काढले आहे.
Corona | China Covid 19 Cases | Corona News Updates | Latest Coronavirus Updates
Corona | China Covid 19 Cases | Corona News Updates | Latest Coronavirus UpdatesDainik Gomantak
Published on
Updated on

Corona News: तीन वर्षापुर्वी जगात कोरना विषाणूने थैमान घातले होते. याचा उद्रेक चीनमध्ये झाला होता. आता पुन्हा तीन वर्षांनंतर चीनमध्ये तीच स्थिती उद्भवली आहे. कारण चीनमध्ये कोरोनाने पुन्हा डोकं वर काढायला सुरवात केली आहे. चीनमध्ये कोरोनाचा कहर थांबण्याचे नावच घेत नाही. गेल्या दोन वर्षांपासून चीनमध्ये कोरोनाचे थैमान सुरुच आहे. एका रिपोर्टनुसार 50 लाख नागरिक कोरोनाच्या विळख्यात सापडण्याची शक्यता आहे.

चीनच्या बिजिंगमध्ये कोरोनाच्या (Corona) समूह संसर्गाला सुरुवात झाली आहे. बीजिंगमध्ये कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. बीजिंगच्या स्मशानभूमीत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या अंत्यसंस्कारासाठी देखील भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. चीनमध्ये (China) फक्त बीजींगच नाही तर अनेक ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे.

चीनमध्ये आतापर्यंत 66 लाखाहून अधिक कोरोनाचे बळी गेले आहेत. तीन वर्षांपूर्वी चीनमध्ये कोरोनाने जसे थैमान घातले होते तसाच कोरोनाचा पुन्हा एकदा विकोप व्हायला सुरुवात झाली आहे.

चीनने 7 डिसेंबरपासून दहा सूत्रीय नोटीस जारी करुन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांना क्वारंटाईन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. चीनमध्ये पुन्हा एकदा टेस्टिंगला सुरुवात झाली आहे. 11 डिसेंबरला 22 हजार रुग्ण कोरोनावर उपचार घेण्यासाठी आले होते. मात्र आठवडाभरातच 16 पटीने रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या काळात चीनमध्ये कोरोनाची परिस्थिती कशी हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.

Corona | China Covid 19 Cases | Corona News Updates | Latest Coronavirus Updates
North Korea Missile: उत्तर कोरियाची दादागिरी सुरूच; आणखी दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली...
  • कोरोनामुळे चीन आर्थिक संकटात सापडण्याचीही शक्यता

तज्ज्ञांच्या माहितीनुसार चीनमध्ये जवळपास 9 लाख 64 हजार 400 जणांचा कोरोनामुळे मृत्यू होण्याची शक्यता आहे. तर जून 2023 पर्यंत दहा लाख जणांचा कोरोनामुळे मृत्यू होण्याची शक्यता आहे. तर अनेक रिपोर्ट्समध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, डिसेंबर 2022 ते जानेवारी 2023 पर्यंत कोरोना चीनच्या सर्व राज्यांमध्ये पसरण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com