Taliban-China: तालिबान सरकारला मान्यता देणार चीन ठरला जगातील पहिला देश

Taliban Government: अमेरिकन सैन्याच्या माघारीनंतर ऑगस्ट 2021 मध्ये तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता स्थापन केली. त्यानंतरही चीनने पाकिस्तान आणि रशियासह अफगाणिस्तानमध्ये आपला दूतावास कायम ठेवला होता.
Taliban Government|China
Taliban Government|ChinaDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

China became the first country in the world to recognize the Taliban government in Afganistan:

अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला मान्यता देणारा चीन हा जगातील पहिला आणि एकमेव देश ठरला आहे. आता बीजिंगमध्ये अफगाणिस्तानच्या राजदूतांची नियुक्ती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

चीनच्या या निर्णयामुळे त्यांचा खास मित्र पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे कारण पाकिस्तानने अद्याप तालिबानला मान्यता दिलेली नाही.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी मीडिया ब्रीफिंग दरम्यान ही माहिती दिली आणि सांगितले की, तालिबानने नामनिर्देशित केलेल्या बिलाल करीमी यांना राजदूताचा दर्जा देण्यात आला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, अफगाणिस्तानचा दीर्घकाळचा शेजारी म्हणून चीनचा असा विश्वास आहे की, अफगाणिस्तानला आंतरराष्ट्रीय समुदायातून वगळले जाऊ नये.

अमेरिकन सैन्याच्या माघारीनंतर तालिबानने अफगाणिस्तानात ऑगस्ट 2021 मध्ये सत्ता स्थापन केली. त्यानंतरही चीनने पाकिस्तान आणि रशियासह अफगाणिस्तानमध्ये आपला दूतावास कायम ठेवला होता.

अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात आल्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदायात तालिबानची अनेक गोष्टींवरून निंदा झाली. ज्यामध्ये महिला व मुलींशी गैरवर्तन करणे, महिलांना शालेय शिक्षणापासून दूर ठेवणे. यावरून संपूर्ण जगाने तालिबानचा निषेध केला होता.

आतापर्यंत कोणत्याही देशाने अधिकृतपणे तालिबान सरकारला मान्यता दिलेली नाही. अफगाणिस्तानमध्ये मानवी हक्कांची पायमल्ली होत असून, महिलांच्या हक्कांचीही पायमल्ली होत असल्याचा आरोप जगातील अनेक देश करतात.

Taliban Government|China
उन्हाळ्यात पाऊस आणि पावसाळ्यात ऊन, गेल्या काही वर्षांपासून असे का होतेय? WMO ने दिले प्रत्येकाला पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर

चीनचा खास मित्र पाकिस्तानबद्दल तालिबान सरकारला राग आहे. अलीकडे पाकिस्ताननेही अफगाणिस्तानातील निर्वासितांना आपल्या देशातून बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे.

पाकिस्तानमध्ये वारंवार होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमागे तालिबानचा हात असल्याचाही पाकिस्तानचा आरोप आहे. अफगाणिस्तानातून केवळ इस्लामी दहशतवादी संघटनाच हल्ले करतात आणि तालिबान सरकार कोणतीही कारवाई करत नाही. या प्रकारामुळे पाकिस्तान संतप्त आहे.

Taliban Government|China
Imran Khan: इम्रान खान आणि बुशरा बीबी यांच्यात... नोकराच्या खुलाशाने पाकिस्तानात खळबळ

'तालिबान सरकार मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करेल'

चीनच्या या निर्णयाचा बचाव करताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन म्हणाले की, अफगाणिस्तान यापुढे आंतरराष्ट्रीय समुदायाच्या अपेक्षा पूर्ण करेल अशी आम्हाला आशा आहे. खुली आणि सर्वसमावेशक राजकीय रचना तयार करेल.

वांग म्हणाले, आम्हाला विश्वास आहे की, तालिबान सरकारची राजनैतिक मान्यता स्वाभाविकपणे येईल, कारण विविध देशांच्या चिंता येत्या काळात प्रभावीपणे दूर केल्या जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Pakistan Defense Minister Khawaja Asif Video
Trump Signs Sanctioning Russia & Iran Act 2026
AI Chatbot False Intelligence Report US China War
India Rejects Pakistan China Joint Boundary Commission
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com