BRICS Group: पाकिस्तान सध्या आर्थिक संकटाबरोबर राजकीय संकटाचा सामना करत आहे. यातच आता, पाकिस्तानला ब्रिक्स समूहाचा सदस्य व्हायचं आहे. पाकिस्तानने ब्रिक्सचे सदस्य होण्यासाठी अर्ज केला आहे. या संघटनेचा सदस्य होण्यासाठी पाकिस्तान आपला सर्वकालीन मित्र चीनच्या मदतीने रशियाचा पाठिंबा घेऊ शकतो, असे बोलले जात आहे.
पाकिस्तानचे रशियातील राजदूत मुहम्मद खालिद जमाली म्हणाले की, पाकिस्तानने 2024 मध्ये ब्रिक्स देशांच्या गटात सामील होण्यासाठी अर्ज केला आहे आणि हे सदस्यत्व मिळवण्यासाठी रशियाचे समर्थन हवे आहे.
जमाली पुढे म्हणाले की, पाकिस्तानने ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स गटाचे सदस्य होण्यासाठी आधीच अर्ज केला आहे. पुढील वर्षी रशियाच्या अध्यक्षतेखाली पाकिस्तानला या गटाचे सदस्यत्व मिळू शकेल अशी आशा आहे.
दुसरीकडे, रशियाचे उप परराष्ट्र मंत्री सर्गेई रियाबकोव्ह यांनी ऑक्टोबरच्या सुरुवातीला सांगितले होते की, 2024 मध्ये रशियातील कझान येथे होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेपूर्वी ब्रिक्स नवीन सदस्यांची यादी तयार करण्याची योजना आखत आहे. या वर्षी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या BRICS परिषदेत अर्जेंटिना, इजिप्त, इथियोपिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीला नवीन सदस्य म्हणून मान्यता देण्यात आली होती. हे देश 2024 मध्ये रशियात होणाऱ्या परिषदेत औपचारिकपणे सहभागी होतील.
पाकिस्तान गंभीर आर्थिक आणि राजकीय संकटाचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत चीन आपला मित्र देश पाकिस्तानला या परिषदेत सामील करुन घेण्यासाठी लॉबिंगमध्ये व्यस्त असल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी तो रशियासारख्या देशांचा मागच्या दाराने पाठिंबाही घेत आहे. याचे कारण चीनला या संघटनेत आपली ताकद वाढवायची आहे.
2010 मध्ये ब्रिक्स गटाची स्थापना झाली. ही संघटना अस्तित्वात आली तेव्हा ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे या गटाचे संस्थापक सदस्य होते. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या ब्रिक्स परिषदेत दक्षिण आफ्रिकेने सहा नवीन देशांना या गटात सामील होण्यासाठी आमंत्रित केले होते. या देशांमध्ये इजिप्त, अर्जेंटिना, इथिओपिया, सौदी अरेबिया आणि यूएई यांचा समावेश होता. हे देश 1 जानेवारी 2024 पासून ब्रिक्स सदस्य देश बनतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.