चीनी सरकारचा नवा फर्मान, सरकारी अधिकाऱ्यांना iPhone वापरण्यावर बंदी!

सरकारी अधिकाऱ्यांना Apple iPhones आणि इतर परदेशी ब्रँड कामासाठी वापरु नयेत किंवा कार्यालयात आणू नयेत असा आदेश चीनने दिला आहे.
Xi Jinping
Xi JinpingDainik Gomantak

China News: चीनमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. सरकारी अधिकाऱ्यांना Apple iPhones आणि इतर परदेशी ब्रँड कामासाठी वापरु नयेत किंवा कार्यालयात आणू नयेत असा आदेश चीनने दिला आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलने या प्रकरणाशी परिचित लोकांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. चीनच्या सीमेबाहेरील संवेदनशील माहितीवर रोख लावण्यासाठी कथित प्रयत्नांमध्ये शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखालील राजवटीचा हा नवीन आदेश आहे.

चीन अ‍ॅपलच्या सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे आणि कंपनीच्या एकूण कमाईमध्ये त्याचा वाटा 19 टक्के आहे.

रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात Apple (AAPL.O) व्यतिरिक्त इतर फोन उत्पादकांचे नाव दिलेले नाही.

अ‍ॅपल इव्हेंटपूर्वी बंदी घातली

दरम्यान, पुढील आठवड्यातील अ‍ॅपल इव्हेंटच्या अगोदर ही बंदी घालण्यात आली आहे, जे विश्लेषकांना वाटते की, आयफोनची नवीन मालिका लॉन्च होईल. या घोषणेमुळे चीनमध्ये (China) काम करणाऱ्या विदेशी कंपन्यांची चिंता वाढली आहे.

Xi Jinping
China Economic Crisis: सुपर पॉवर होण्याचे स्वप्न भंगणार! चीन अर्थव्यवस्थेला संकटांनी घेरले

डेटा सुरक्षेबाबत चीन चिंतेत आहे

चीन अलिकडच्या वर्षांत डेटा सुरक्षिततेबद्दल अधिक चिंतित आहे. यासाठी चीनी सरकारने कंपन्यांवर वचक ठेवण्यासाठी नवीन कायदे लागू केले आहेत.

मे महिन्यात, चीनने मोठ्या सरकारी मालकीच्या उद्योगांना (SOEs) तंत्रज्ञानात स्वावलंबन मिळवण्याच्या त्याच्या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावण्याचे आवाहन केले होते.

चीन-अमेरिका (America) तणाव या क्षणी खूप वाढला आहे. वॉशिंग्टन त्यांच्या चिप इंडस्ट्रीच्या संरक्षणासाठी आवश्यक ती पाऊले उचलत आहे.

दुसरीकडे, बीजिंग विमान निर्माता कंपनी बोईंग आणि चिप कंपनी मायक्रॉन टेक्नॉलॉजीसह मोठ्या अमेरिकन कंपन्यांच्या शिपमेंटवर निर्बंध घालत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com