China-Pakistan Relation: सीपीईसी प्रकल्पावरुन चीन-पाकिस्तानमध्ये वाद

China-Pakistan Relation: याबरोबरच, पाकिस्तानमध्येसुद्धा राजकीय अस्थिरतेमुळे आर्थिक परिस्थिती डगमगल्याचे दिसून येते.
 China
China Dainik Gomantak
Published on
Updated on

China-Pakistan Relation: चीनमध्ये सध्या कोरोणाने कहर घातला आहे. त्यामुळे चीनमधील आर्थिक परिस्थिती बिघडल्याचे दिसून येत आहे. याबरोबरच, पाकिस्तानमध्येसुद्धा राजकीय अस्थिरतेमुळे आर्थिक परिस्थिती डगमगल्याचे दिसून येते.

चीन( China) आणि पाकिस्तान( Pakistan) ने आर्थिक प्रश्नावर मार्ग म्हणून सीपीईसी प्रकल्प सुरु केला होता. हा प्रकल्प गेमचेंजर म्हणून ओळखला जात होता . आता मात्र अरब डॉलरची गुंतवणुक असलेल्या या सीपीईसी प्रोजेक्टवरुन चीन पाकिस्तान या दोन देशांत वाद सुरु झाल्याचे दिसून येत आहे. प्रकल्प ज्या वेगाने सुरु आहे, त्यावर चीनने प्रश्न उपस्थित केले आहेत.

चीनच्या राजदूताने इस्लामाबादच्या प्रधानमंत्र्याच्या मीटींगमध्ये हे मान्य केले आहे की, पाकिस्तानमध्ये काम करत असलेल्या चीनच्या कंपन्या कमी गतीने काम करत आहेत.

 China
Pakistan: भारतासोबत संबंध सुधारण्याची इच्छा परंतु....

कराची मध्ये असलेल्या बिझनेस रेकॉर्ड रिपोर्टनुसार, चीनच्या राजदूताने चीनच्या कंपन्याप्रति पाकिस्तानमधील वीज नियामक कंपन्यांनी असहयोग दर्शवल्याचे सांगितले आहे. त्यामुळे प्रकल्पाला विलंब होत असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर, चीनच्या राजदुताने योग्य नियम, लायसन्स देण्याची सुविधा निर्माण करण्याचे सुचवले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com