Pakistan: भारतासोबत संबंध सुधारण्याची इच्छा परंतु....

Pakistan: विदेश मंत्रालयाच्या प्रवक्ता मुम्ताज जहरा बलोच यांनी एका पत्रकार परिषदेतून हे वक्तव्य केले आहे. दक्षिण आशियातील सगळ्या देशांसोबत पाकिस्तान आपले संबंध चांगले राखण्यासाठी शांतीपुर्ण मार्गाचा अवलंब करणे सुरु ठेवेल असेही म्हटले आहे.
Pakistan
PakistanDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan: भारत आणि पाकिस्तानमधील वाद जुनाच आहे.दहशतवाद, काश्मीरचा मुद्दा,चीन अशा अनेक कारणांवरुन भारत आणि पाकिस्तानमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असतात.आता पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतावर आरोप लावताना म्हटले आहे की, पाकिस्तान भारताबरोबर संबंध सुधारु इच्छितो परंतु भारताला पाकिस्तानबरोबर संबंध चांगले करण्याची इच्छा नसल्याचे म्हटले आहे.

काश्मिरबाबत चर्चेतून मार्ग काढण्यासाठी भारताने गंभीरता दाखवली पाहिजे. विदेश मंत्रालयाच्या प्रवक्ता मुम्ताज जहरा बलोच यांनी एका पत्रकार परिषदेतून हे वक्तव्य केले आहे. दक्षिण आशियातील सगळ्या देशांसोबत पाकिस्तान आपले संबंध चांगले राखण्यासाठी शांतीपुर्ण मार्गाचा अवलंब करणे सुरु ठेवेल असेही म्हटले आहे.

पुढे त्या म्हणतात,पाकिस्तानची शांती आणि संवाद यामध्ये रुची आहे.आता हे भारतावर अवलंबून आहे की भारत कोणती पद्धत आपलीशी करत आहे. पाकिस्तान( Pakistan ) चे हे म्हणणे आहे की, बऱ्याच काळापासून प्रलंबित झालेल्या विषयावर मार्ग काढणे गरजेचे आहे विशेषत: काश्मिरच्या मुद्द्यावर मार्ग काढणे गरजेचे आहे.

Pakistan
PM Modi Mother Hiraba Passes Away: पाक पंतप्रधांनाचा PM मोदींना शोक संदेश, 'आई गमावण्यापेक्षा मोठे नुकसान...'

दरम्यान, युएन ( UN )च्या परिषदेत पाकिस्तानने काश्मीरचा मुद्द्यावर विधान केले होते तेव्हा एस.जयशंकर यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले होते. आता पाकिस्तानच्या या विधानावर भारत काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com