India Vs Bharat वादात चीनची उडी, पंतप्रधान मोदींना दिला 'हा' सल्ला

PM Narendra Modi And Xi Jinping: चीनचे म्हणणे आहे की, भारत G-20 चा वापर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला प्रभाव वाढवण्यासाठी करत करत आहे. अशा स्थितीत भारताने नावापेक्षा महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
PM Narendra Modi And Xi Jinping
PM Narendra Modi And Xi JinpingDainik Gomantak

China Advice On India vs Bharat Renaming Row: इंडिया विरुद्ध भारत या देशाच्या नावावरुन निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत होणाऱ्या G-20 परिषदेची तयारी पूर्ण झाली आहे.

त्यात अमेरिका, कॅनडा, ब्रिटनसह इतर देशांचे प्रमुख सहभागी होणार आहेत. अशा परिस्थितीत चीनने देशाच्या नामकरणाच्या वादात विनाकारण उडी घेतली आहे.

चीनचे म्हणणे आहे की, भारत G-20 च्या मंचाचा वापर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला प्रभाव वाढवण्यासाठी करत करत आहे. अशा स्थितीत भारताने नावापेक्षा महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

चीनने (China) ग्लोबल टाइम्स या मुखपत्रातून म्हटले की, भारत आपल्या आर्थिक व्यवस्थेत व्यापक सुधारणा करु शकतो की नाही? भारताला आर्थिक व्यवस्थेत क्रांतिकारी सुधारणांची गरज आहे. क्रांतिकारी सुधारणांशिवाय भारत क्रांतिकारक विकास साधू शकत नाही.

PM Narendra Modi And Xi Jinping
INDIA-भारत विवादावर संयुक्त राष्ट्रांचं मोठं वक्तव्य, 'नाव बदलण्याची रिक्वेस्ट आल्यास...'

दिल्लीला काय संदेश द्यायचा आहे?

जी-20 परिषदेमुळे संपूर्ण जगात भारताची (India) ख्याती होईल, असे चीनने म्हटले. भारत या संधीचा अधिक चांगल्या पद्धतीने फायदा घेऊ शकतो.

विशेष म्हणजे, तो विकासाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकू शकतो, असेही चीनने म्हटले आहे. चीनने विचारले की, जगाच्या नजरा G-20 शिखर परिषदेकडे लागल्या असताना नवी दिल्ली जगाला काय संदेश देऊ इच्छित आहे?

देशाचे नाव बदलून वसाहतवादी काळातील नावे नष्ट करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे दिसते, असेही पुढे चीनने म्हटले.

हे नाव बदलण्यापेक्षा महत्त्वाचे आहे

दरम्यान, 1991 नंतर केलेल्या आर्थिक सुधारणांबद्दल बोलायचे झाल्यास, मोदी सरकार हे भारतातील सर्वात महत्त्वाकांक्षी सरकारांपैकी एक आहे. पण दुर्दैवाने भारत वेगाने व्यापार संरक्षणवादाच्या दिशेने वाटचाल करत आहे. देशाचे नाव बदलण्यापेक्षा हे सर्व महत्त्वाचे आहे.

पुढे, काही चिनी कंपन्यांवर भारताच्या अलीकडील कारवाईचा संदर्भ देत, अहवालात म्हटले आहे की, जगासमोर आपली बाजारपेठ पूर्णपणे खुली करण्याचा भारताचा संकोच समजण्यासारखा आहे.

परंतु 1947 पासूनचा इतिहास आपल्याला सांगतो की भारत प्रत्येक वेळी सुधारणा आणि आर्थिक उदारीकरणाला प्रोत्साहन देतो. आर्थिक विकासाला चालना देतो.

PM Narendra Modi And Xi Jinping
ASEAN-India Summit: मोदींचे इंडोनेशियामध्ये जंगी स्वागत; पाहा व्हिडिओ

त्यामुळे चीन नाराज झाला

भारताला त्याच्या G20 च्या अध्यक्षपदाचा सल्ला देताना, चीनने म्हटले आहे की, भारताने आपल्या अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्याचा, खुलेपणा वाढवण्याचा, परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याचा आणि परदेशी गुंतवणूकदारांना योग्य व्यावसायिक वातावरण उपलब्ध करुन देण्याचा आपला दृढनिश्चय दाखवण्याची गरज आहे. विशेष म्हणजे, भारताने G-20 अध्यक्षपदाचा वापर करुन योग्य त्या उपाययोजना केल्या पाहिजेत.

इंडिया विरुद्ध भारत वाद का निर्माण झाला?

वास्तविक, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी G-20 डिनरचे निमंत्रण पाठवल्यानंतर देशात राजकीय वादळ उठले. निमंत्रण पत्रावर द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख 'प्रेसिडेंट ऑफ इंडिया' ऐवजी 'प्रेसिडेंट ऑफ भारत' असा केला होता.

PM Narendra Modi And Xi Jinping
VIDEO: PM मोदींचे दक्षिण आफ्रिकेत जंगी स्वागत, लहान मुलाच्या डोक्यावर हात ठेवून...

भाजप नेत्यांनी देशाचे नाव बदलण्याची मागणी केली

दुसरीकडे, भाजपच्या (BJP) अनेक नेत्यांनी देशाचे नाव बदलून भारत असे करण्याची मागणी केली आहे.

नुकतेच संसदेच्या पावसाळी अधिवेशनात भाजप खासदार नरेश बन्सल यांनी राज्यसभेत इंडिया हे नाव वसाहतवादी गुलामगिरीचे प्रतिक असून ते घटनेतून काढून टाकले पाहिजे, असे म्हटले होते.

यापूर्वी, गुवाहाटी येथील एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी इंडियाऐवजी 'भारत' असा शब्दप्रयोग करावा यावर भर दिला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com