INDIA-भारत विवादावर संयुक्त राष्ट्रांचं मोठं वक्तव्य, 'नाव बदलण्याची रिक्वेस्ट आल्यास...'

Deputy Spokesperson Farhan Haq: मागील काही दिवसांपासून देशाच्या नावावरुन राजकीय घमासान सुरु आहे.

Deputy Spokesperson Farhan Haq
Deputy Spokesperson Farhan HaqDainik Gomantak

मागील काही दिवसांपासून देशाच्या नावावरुन राजकीय घमासान सुरु आहे. G-20 शिखर परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेत 'प्रेसिडेंट ऑफ इंडिया' ऐवजी 'प्रेसिडेंट ऑफ भारत' असे लिहिल्यानंतर हा संघर्ष आणखी वाढला.

दरम्यान, संयुक्त राष्ट्राचेही याबाबत वक्तव्य आले आहे. युएनचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचे उप प्रवक्ते फरहान हक म्हणाले की, जर त्यांना नाव बदलण्याची रिक्वेस्ट आल्यास ते त्यावर विचार करतील.

यासाठी त्यांनी तुर्कीचे उदाहरण दिले. फरहान हक यांना विचारण्यात आले की, 'India'चे नाव बदलून 'भारत' करता येईल का? त्यावर ते म्हणाले की, नाव बदलण्याची रिक्वेस्ट आमच्याकडे येईल, तेव्हा विचार करु.

यादरम्यान ते म्हणाले की, तुर्कीने गेल्या वर्षी नाव बदलण्याची विनंती केली होती. त्यांनी तुर्कस्तानचे नाव 'तुर्की' करण्याची विनंती केली होती. त्यावर आम्ही विचार केला होता.


Deputy Spokesperson Farhan Haq
ASEAN-India Summit: मोदींचे इंडोनेशियामध्ये जंगी स्वागत; पाहा व्हिडिओ

'India विरुद्ध भारत'वरुन राजकीय गदारोळ

दरम्यान, देशात मंगळवारपासून हा वाद सुरु झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या G-20 आमंत्रणावर 'प्रेसिडेंट ऑफ इंडिया' ऐवजी 'प्रेसिडेंट ऑफ भारत' असे लिहिण्यात आल्याने इंडिया विरुद्ध भारत वाद आणखी तापला.

विरोधी पक्षांनी या मुद्यावरुन मोदी सरकारला निशाण्यावर घेतले. काँग्रेस (Congress) अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, मोदी सरकार विरोधी पक्षांच्या युतीला घाबरले आहे. इंडिया आणि भारत हे दोन्ही शब्द संविधानाचा अविभाज्य भाग आहेत.

'भारत'च्या मुद्द्यावरुन वाद टाळा - पंतप्रधान मोदी

त्याचवेळी, बुधवारी पंतप्रधान मोदींनी आपल्या मंत्र्यांना 'भारत' मुद्द्यावर राजकीय वाद टाळण्यास सांगितले. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी G-20 शिखर परिषदेदरम्यान काय करावे आणि काय करु नये याबद्दल सांगितले.

भारताच्या (India) अध्यक्षतेखाली 9 आणि 10 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत G-20 शिखर परिषद आयोजित केली जात आहे आणि त्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासह जगातील अनेक राष्ट्रप्रमुख सहभागी होत आहेत.


Deputy Spokesperson Farhan Haq
G-20 Summit: चीनचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार नाहीत, चीनी परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं कोण येणार G -20 साठी...

18-22 सप्टेंबर रोजी संसदेचे विशेष अधिवेशन

मोदी सरकारने 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. यावेळी मोदी सरकार देशाचे नाव 'इंडिया' ऐवजी 'भारत' करण्याचा प्रस्ताव आणू शकते.

जर हा प्रस्ताव संसदेत मंजूर झाला आणि देशाचे नाव बदलून 'इंडिया' केले गेले, तर 2024 पूर्वी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला मोठा फटका बसू शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com