Video: अमेरिकेत बंदूकधाऱ्यांचा आतंक, शिकागोमधील गोळीबारात 6 ठार, 24 जखमी

अमेरिकेत गोळीबाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत.
Chicago
Chicago Dainik Gomantak
Published on
Updated on

Chicago Mass Shooting: अमेरिकेत गोळीबाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शिकागोमध्ये काढण्यात आलेल्या सार्वजनिक परेडमध्ये पुन्हा एकदा गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ते अशा संशयिताचा शोध घेत आहेत, ज्याने छतावरुन परेडमधील सहभागी लोकांवर गोळीबार केला असावा. (Chicago Mass Shooting Illinois Latest iIncident Of Mass Shooting iIn USA)

छतावरुन गोळ्यांचा वर्षाव सुरु झाला

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोमवारी सकाळी शिकागो (Chicago), इलिनॉय प्रांतात परेड सुरु झाल्यानंतर सुमारे 10 मिनिटांनी ही धक्कादायक घटना घडली. गोळीबार सुरु झाल्यानंतर लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली, त्यानंतर परेड थांबवण्यात आली. हायलँड पार्क एरियाचे पोलिस कमांडर क्रिस ओ'नील यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोक अमेरिकेच्या (America) स्वातंत्र्य दिनानिमित्त सार्वजनिक परेड काढत होते. याचवेळी छतावरुन गोळ्यांचा वर्षाव सुरु झाला. गोळीबार होताच लोक घाबरुन सैरावैरा धावू लागले. या गोळीबारात गोळ्या लागल्याने अनेक जण जखमी झाले आहेत. त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत.

Chicago
अमेरिका गोळीबार आणि नरसंहार रोखण्यासाठी कठोर पाऊल उचलणार

इमारतीच्या छतावरुन बंदूक जप्त करण्यात आली

घटनेनंतर लगेचच पोलिसांनी एका इमारतीला घेराव घातला. पोलीस अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, पोलिस (Police) पथकाला इमारतीच्या गच्चीमध्ये एक बंदूक सापडली, मात्र तोपर्यंत बंदूकधारी तिथून गायब झाला होता. हल्लेखोराला पकडणे अत्यावश्यक बनले असून तो इतर लोकांवरही हल्ला करु शकतो, असे पोलिस अधिकाऱ्यांचे मत आहे.

Chicago
अमेरिका अन् कॅनडामध्ये हिपॅटायटीस ए व्हायरस पसरतोय म्हणून स्ट्रॉबेरीवर घातली बंदी

'या घटनेने आम्हाला हादरवले'

शहराच्या महापौर नॅन्सी रॉटरिंग म्हणाल्या, 'आज सकाळी 10:14 वाजता हिंसाचाराच्या माध्यमातून आमच्या समुदायाला घाबरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेने आपल्याला हादरवून सोडले आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com