कॅन्सरमुळे कमी होतेयं राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची दृष्टी? राहिली फक्त 3 वर्षे!

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे युक्रेन आणि रशिया युद्धावरून सतत चर्चेत असतात.
Vladimir Putin
Vladimir PutinDainik Gomantak
Published on
Updated on

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) हे युक्रेन आणि रशिया (Russia Ukriane War) युद्धावरून सतत चर्चेत असतात. नेहमी पुतिन यांच्या फिटनेस आणि राहनीमानाची चर्चा होत असते. त्यांच्या फिटनेसची चर्चा अख्ख्या जगभर आहे. मात्र आजकाल रशियन राष्ट्राध्यक्षांच्या प्रकृतीबाबत एक माहिती समोर येत आहे. व्लादिमीर पुतिन यांच्या शरिरात कर्करोगाचा प्रसार वेगाने होत आहे, अशी माहिती रशियन सुत्रधाराकडून दिली जात आहे. (Cancer lowers President Putin vision Only 3 years left)

Vladimir Putin
अमेरिका अन् कॅनडामध्ये हिपॅटायटीस ए व्हायरस पसरतोय म्हणून स्ट्रॉबेरीवर घातली बंदी

69 वर्षीय पुतीन यांच्या शरीरातील कर्करोग वेगाने आणि गंभीर स्वरुपात वाढत असल्याची माहिती सुत्रधारांनी दिली आहे.पुतिन त्यांची दृष्टी कमी होत चालली आहे. त्यांच्याकडे जगण्यासाठी दोन ते तीन वर्षांपेक्षा जास्त वेळ नाही, असेही सांगण्यात येत आहे.

कॅन्सर आणि पार्किन्सन्सशी बऱ्याच दिवसांपासून पुतिन झुंज देत आहेत. ते कर्करोग आणि पार्किन्सन्स आजाराने ग्रस्त आहेत. या महिन्यात पुतिन यांच्या पोटातील द्रव काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. कोणतीही अडचण न येता त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

रशियाच्या अध्यक्षांनी गेल्या आठवड्यात सोची येथे बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को (Aleksandr Lukashenko) यांची भेट घेतली आहे. कार्यक्रमादरम्यानही पुतिन आपले पाय अस्ताव्यस्तपणे हलवताना दिसून आले. या कृतीवरून सोशल मिडियावर बरीच चर्चा रंगली होती. पुतिन यांना आणखी दोन ऑपरेशन करावे लागतील. मात्र, त्या संबंधित तारीख अद्याप ठरलेली नाही, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com