गायक अदनान सामी आपल्या भारतीय नागरिकत्वावरून अनेकदा टीकाकारांच्या निशाण्यावर येत असतो. आता अदनानचा भाऊ जुनैद सामी खान याने खळबळजनक दावा करत, अदनानला स्वार्थी, लबाड म्हटले आहे.
अदनानची पदवी देखील बनावट त्याने असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही तर जुनैदने भाऊ अदनानच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एक धक्कादायक दावाही केला आहे.
जुनैदने सोशल मिडियावर एक लांबलचक पोस्ट लिहून अदनानवर निशाणा साधला आहे. त्याने ही पोस्ट हटवली असली तरी, पण तोपर्यंत जुनैदच्या पोस्टचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पोस्टमध्ये जुनैदने अदनान सामीवर त्याचे करिअर घडवण्यात अजिबात मदत न केल्याचा आरोप केला.
अदनानचा जन्म 15 ऑगस्ट 1969 रोजी रावळपिंडी येथील रुग्णालयात झाला होता. माझाही जन्म 1973 मध्ये याच हॉस्पिटलमध्ये झाला होता. त्यामुळे अदनानचा जन्म इंग्लंड किंवा इतर कोणत्याही ठिकाणी झाल्याचा दावा खोटा आहे. इंग्लंडमध्ये ओ लेव्हलमध्ये नापास झाल्यानंतर त्याने लाहोरमधून पदवी मिळवली. त्याने अबुधाबीमध्ये खाजगीरित्या ए लेव्हल केले. असे जुनैदने पोस्टमध्ये लिहिले आहे.
अदनानला माहित होते की मी प्रतिभावान आहे आणि गाणे गाऊ शकतो. पण त्याची कधीच पर्वा त्याने केली नाही. तो स्वार्थी आहे. मला भारतात कधीच लॉन्च केले नाही. अदनानला भीती होती की मी त्याला मागे टाकेन? आता मी घरी बसून काही करत नाही. याला अदनान सर्वात मोठा जबाबदार आहे.
अदनानने भारताचे नागरिकत्व घेतले कारण त्याला तेथे चांगले पैसे दिले जात होते. जे पाकिस्तान करू शकले नाही. आपल्या आईला भारतीय म्हणण्याचा अदनानचा दावाही खोटा आहे. छाप्यादरम्यान अदनान कॅनडातील तुरुंगात गेला आहे. असे जुनैदने म्हटले आहे.
अदनानने त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या पॉर्न डीव्हीडी बनवल्याचा त्याचा दावा आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले- या गोष्टीचा मला त्रास झाला. मी माझ्या मैत्रिणीसोबतही हे करत नाही. अदनानने 2007-8 च्या सुमारास दुसरी पत्नी सबा गलादेरीच्या पॉर्न डीव्हीडी बनवल्या. पती-पत्नीमधील गोष्टी फक्त आपापसातच ठेवल्या जातात. अदनानने या डीव्हीडी कोर्टाला दिल्या होत्या.
दरम्यान, भावाच्या या दाव्यांवर अदनानने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.