British Telecom Company: ब्रिटिश टेलिकॉम कंपनीची मोठी घोषणा, 55000 कर्मचाऱ्यांना काढणार!

ब्रिटीश टेलिकॉम कंपनी बीटी ग्रुपने दशकाच्या अखेरीस 55,000 कर्मचाऱ्यांची कपात करण्याची योजना आखली आहे.
British Telecom Company
British Telecom CompanyDainik Gomantak
Published on
Updated on

British Telecom Company: ब्रिटीश टेलिकॉम कंपनी बीटी ग्रुपने दशकाच्या अखेरीस 55,000 कर्मचाऱ्यांची कपात करण्याची योजना आखली आहे. खर्च कमी करण्यासाठी कंपनी हे पाऊल उचलणार आहे.

BT मध्ये नियमित आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांची एकत्रित संख्या 1,30,000 आहे. कंपनीने आपल्या अलीकडील कमाईच्या अहवालात म्हटले आहे की, 2030 पर्यंत त्यांचे कर्मचारी 75,000 ते 90,000 पर्यंत कर्मचारी राहतील.

यापूर्वी, ब्रिटीश टेलिकॉम या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी फिलिप जॅन्सेन यांनी सांगितले होते की, 2020 च्या दशकाच्या अखेरीस बीटी ग्रुपच्या कर्मचार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि खर्चही मोठ्या प्रमाणात कमी होईल.

British Telecom Company
Facebook ने पुन्हा एकदा 10,000 कर्मचाऱ्यांना दिल्ला डच्चू, नवीन नोकऱ्या शोधणाऱ्यांची झाली निराशा

व्होडाफोनने देखील घोषणा केली: यापूर्वी, व्होडाफोन, युरोप (Europe) आणि आफ्रिकेत कार्यरत असलेल्या ब्रिटीश टेलिकॉम कंपनीने मोठ्या पुनर्रचनेचा भाग म्हणून 11,000 कर्मचार्‍यांना (Employees) काढून टाकण्याची घोषणा केली.

पुढील तीन वर्षांत नोकऱ्यांमध्ये कपात करण्यात येणार असल्याचे व्होडाफोनने म्हटले आहे. कंपनीने इटली, जर्मनी आणि यूके येथील मुख्यालयात आधीच टाळेबंदी जाहीर केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com