लोन घेण्यासाठी महिला डेड बॉडी घेऊन पोहोचली बँकेत; या प्रकरणाने उडाली खळबळ

Brazil Crime: लोन घेण्यासाठी एक महिला चक्क व्हीलचेअरवर डेड बॉडी घेऊन बँकेत पोहोचल्याने एकच गोंधळ उडाला.
Loan
LoanDainik Gomantak

Brazil Crime: सध्या ब्राझीलमध्ये एक व्हिडिओ राष्ट्रीय चर्चेचा विषय बनला आहे. लोन घेण्यासाठी एक महिला चक्क व्हीलचेअरवर डेड बॉडी घेऊन बँकेत पोहोचल्याने गोंधळ उडाला. या घटनेचे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांचे म्हणणे आहे की, महिलेला $3,000 चे लोन घ्यायचे होते. बँकेने हे लोन मंजूर केले होते पण त्यासाठी एका वृद्ध व्यक्तीची स्वाक्षरी आवश्यक होती. व्हीलचेअरवर बसलेली व्यक्ती तिचा काका असल्याचा दावा महिलेने केला आहे. ती बँकेत पोहोचल्यावर एका अटेंडंटने तिचा व्हिडिओ बनवला. व्हीलचेअरवर बसलेली व्यक्ती काहीच करत नव्हती परंतु ही महिला त्याच्याशी बोलून तो जिवंत असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करत होती.

दरम्यान, ही महिला रिओ दि जानेरो येथील इटाऊ बँकेत पोहोचली होती. व्हिडिओमध्ये ही महिला व्हीलचेअरवर बसलेल्या व्यक्तीशी बोलत असल्याचे दिसत आहे. ती म्हणते की, 'काका, तुम्ही ऐकता. तुम्हाला सही करावी लागेल. मी तुमच्या वतीने सही करु शकत नाही. फक्त तुम्हीच सही करु शकता. मला जे काही करायचे आहे ते मी करेन. यावर तात्काळ सही करा. मला आता सहन होत नाही. यावर बँक अटेंडंट म्हणतो की, 'मला वाटते की त्यांची तब्येत ठीक नाहीये.' त्याच्या या बोलण्याला दुसरा अटेंडंट दुजोरा देतो.

Loan
America Crime: 41 सेकंदात 100 राऊंड फायरिंग... सीट बेल्ट न लावलेल्या व्यक्तीचा पोलिसांच्या चकमकीत मृत्यू

वकील काय म्हणाले

रिओच्या सिव्हिल पोलिसांच्या प्रमुखांनी सांगितले की, बँक अटेंडंट्सनी त्यानंतर रुग्णवाहिका बोलवण्याचा निर्णय घेतला. वैद्यकीय पथक आल्यावर त्यांनी व्हीलचेअरवर बसलेल्या व्यक्तीची तपासणी केली. काही तासांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस महिला आणि मृत पुरुष यांच्यातील संबंधांचा तपास करत आहेत. दरम्यान, पोलिसांची ही कहाणी खोटी असल्याचे महिलेच्या वकिलाचे म्हणणे आहे. महिला बॅंकेत पोहोचली तेव्हा तिचे काका जिवंत होते. त्यांच्या मृत्यूमुळे महिलेला मोठा धक्का बसला असून तिला उपचाराची गरज असल्याचे वकिल महोदय पुढे म्हणाले. या प्रकरणाचा तपास केला जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com