भारत बायोटेकला कोट्यवधी डॉलर्सचा फटका

कोवाक्सिनच्या (Covaxin) 20 दशलक्ष डोसची डील बोल्सनारोसाठी डोकेदुखी बनली आहे.
Bharat biotech's Covaxin
Bharat biotech's CovaxinDainik Gomantak
Published on
Updated on

ब्राझीलिया: भारत बायोटेकचा (bharat biotech's covaxin) ब्राझीलबरोबर झालेल्या 32.4 करोडाच्या कराराला मोठा फटका बसू शकतो. राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्याविरोधात अनियमिततेच्या आरोपानंतर देशाने हा करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्यमंत्री मार्सेलो किरोगा यांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली. (Brazil suspends Bharat Biotech contract)

मिळालेल्या माहितीनुसार व्हिसलब्लोअर्सनी अध्यक्षांवर अनियमिततेचा जाहीरपणे आरोप केला. तेव्हापासून, कोवैक्सीन 2 कोटी डोसचा हा करार बोल्सोनारोसाठी डोकेदुखी बनला आहे. एजन्सीने आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्ंयाचा हवाला देत म्हटले आहे की, त्यांनी आपल्या या चिंतेबाबतची माहिती राष्ट्राध्यक्षाकडे सांगितली आहे.

Bharat biotech's Covaxin
कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी अमेरिकेची भारताला 4.1 कोटी डॉलरची मदत

एका पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्री किरोगा म्हणाले की, निलंबन दरम्यान त्यांची टीम या आरोपांची चौकशी करेल. “सीजीयूच्या प्राथमिक विश्लेषणानुसार करारामध्ये कोणतीही अनियमितता नाही, परंतु त्या पाळण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने हा करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.” असे मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. यापूर्वी गुरुवारी सीएनएन ब्राझील मंत्रालयाने हा करार रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली होती.

ब्राझीलने वाढीव किंमती आणि नियमकांकडून रखडलेल्या मंजुरीचा हवाला देत या कराराचा तपास सुरू केला आहे. या व्यतिरिक्त, सरकार कोरोना साथीच्या आजारापासून सावरण्याचे पर्यायी मार्ग शोधत आहे. सिनेट पॅनेल देखील या प्रकरणाची चौकशी करत आहे. अध्यक्ष बोल्सोनारोविरोधात विरोधी पक्षातील सेनेटरने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल केली आहे.

Bharat biotech's Covaxin
भारतात मॉडर्ना लसीला मान्यता; DGCI कडून आयातीसाठी मंजूरी!

दरम्यान या गंभीर आरोपांची कोर्टाने चौकशी करावी त्याचबरोबर कोर्टाने बोल्सोनारो यांनी आरोग्य मंत्रालयात इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारावर होत असतांना कारवाई का केली नाही याचाही तपास करावा, असे सिनेटचे सदस्य रॅन्डॉल्फ रॉड्रिग्ज म्हणाले. कोरोनामुळे कोट्यवधी लोकांच्या मृत्यूमुळे बोल्सनारो सरकारला आधीपासूनच देशात टीकेचा सामना करावा लागला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Afghanistan Pakistan Border Tension Drone Strike
Sikh Couple Killed In Pakistan Gurdwara Mardan
Times Square shooting during NBA celebration
Thierry Henry Criticism of Cristiano Ronaldo
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com