Bloomberg Billionaires Index: एलन मस्क यांनी पुन्हा दाखवला जलवा, संपत्तीत मोठी वाढ; अदानी-अंबानींच्या संपत्तीत घट

Elon Musk: टेस्ला, स्पेसएक्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X चे मालक एलन मस्क यांची एकूण संपत्ती $10.8 अब्जने वाढली आहे. वार्षिक कमाईच्या बाबतीत मस्क टॉप-10 मधून बाहेर होते.
Bloomberg Billionaires Index: एलन मस्क यांनी पुन्हा दाखवला जलवा, संपत्तीत मोठी वाढ; अदानी-अंबानींच्या संपत्तीत घट
Elon Musk Dainik Gomantak

टेस्ला, स्पेसएक्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X चे मालक एलन मस्क यांची एकूण संपत्ती $10.8 अब्जने वाढली आहे. वार्षिक कमाईच्या बाबतीत मस्क टॉप-10 मधून बाहेर होते. 2 जुलैपर्यंत मस्क टॉप गेनर्सच्या यादीत 17 व्या स्थानावर होते. पण दुसऱ्याच दिवशी म्हणजे 3 जुलैला 8 अंकाची झेप घेत ते 9व्या क्रमांकावर पोहोचले.

एलन मस्क यांच्या संपत्तीत गेल्या काही दिवसांत झपाट्याने वाढ झाली

एलन मस्क (Elon Musk) यांनी 3 दिवसात 34 अब्ज डॉलर्स एवढी कमाई केली. यंदाच्या कमाईच्या बाबतीत भारतीय उद्योगपती गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांनाही त्यांनी मागे टाकले. मस्क यांनी 2024 मध्ये त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये $23.2 अब्ज एवढी संपत्ती जोडली आहे. त्याचवेळी, गौतम अदानी यांच्या संपत्तीत $21.3 अब्ज आणि मुकेश अंबानींची एकूण संपत्ती $21.2 अब्जने वाढली आहे. या यादीत पहिला क्रमांक जेन्सेन हुआंग आहेत, ज्यांनी अवघ्या 6 महिन्यांत 68.5 अब्ज डॉलर्सची संपत्ती कमावली.

Bloomberg Billionaires Index: एलन मस्क यांनी पुन्हा दाखवला जलवा, संपत्तीत मोठी वाढ; अदानी-अंबानींच्या संपत्तीत घट
Elon Musk: ट्विटरच्या माजी सीईओसह माजी अधिकाऱ्यांचा इलॉन मस्कविरोधात 128 मिलियन डॉलर्सचा खटला

दुसरीकडे, एलन मस्क यांची कंपनी टेस्लाचे शेअर्स गेल्या 5 दिवसात 26% पेक्षा जास्त वाढले आहेत. या कारणास्तव, मस्क यांच्या एकूण संपत्तीत एवढी मोठी वाढ पाहायला मिळाली. मस्क यांनी 3 जुलै रोजी 10.8 अब्ज डॉलर, 2 जुलै रोजी 15.3 अब्ज डॉलर आणि 1 जुलै रोजी 8 अब्ज डॉलरची कमाई केली.

अदानी-अंबानींच्या संपत्तीत घट

भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि गौतम अदानी यांच्या संपत्तीत घट झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, मुकेश अंबानी श्रीमंतांच्या यादीत 12 व्या क्रमांकावर घसरले आहेत. त्यांची एकूण संपत्ती $118 अब्ज आहे. तर, गौतम अदानी 106 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह 14 व्या स्थानावर आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com