Operation Herof2: बलुचिस्तानमध्ये क्वेटासह 10 शहरांवर बलोच बंडखोरांचा ताबा, पाकिस्तानी सैनिक चौक्या सोडून पळाले; 10 ठार VIDEO

Baloch Liberation Army: बीएलएच्या लढाऊ सैनिकांनी क्वेटाच्या बाजारपेठांमध्ये उघडपणे प्रवेश केला असून स्थानिक जनतेने त्यांचे स्वागत केल्याचे आणि टाळ्या वाजवल्याचे व्हिडिओ समोर येत आहेत.
Baloch Liberation Army
Baloch Liberation ArmyDainik Gomantak
Published on
Updated on

Baloch Liberation Army: बलुचिस्तानची राजधानी क्वेटासह या प्रांतातील 10 प्रमुख शहरांमध्ये बलुच लिबरेशन आर्मी या बंडखोर संघटनेने आक्रमण करुन अनेक भागांवर आपले नियंत्रण प्रस्थापित केल्याने पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. 'द बलुचिस्तान पोस्ट'ने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, बीएलएच्या लढाऊ सैनिकांनी क्वेटाच्या बाजारपेठांमध्ये उघडपणे प्रवेश केला असून स्थानिक जनतेने त्यांचे स्वागत केल्याचे आणि टाळ्या वाजवल्याचे व्हिडिओ समोर येत आहेत.

या आक्रमणामुळे पाकिस्तानी सुरक्षा दलांमध्ये प्रचंड घबराट पसरली असून अनेक ठिकाणी पाकिस्तानी सैनिक आपल्या चौक्या सोडून पळून गेल्याचे वृत्त आहे. या मोठ्या कारवाईला बीएलएने 'ऑपरेशन हीरोफ'चा दुसरा टप्पा असे नाव दिले असून यात महिला लढाऊ सैनिकही मोठ्या संख्येने सामील आहेत.

Baloch Liberation Army
Pakistan Economy Crisis: "मुनीर अन् मी पैसे मागतो तेव्हा..." शहबाज शरीफ यांनी मांडली आर्थिक गुलामगिरीची व्यथा; परकीय कर्जाच्या अटींपुढे झुकला पाकड्यांचा कणा

बीएलएच्या लढाऊ सैनिकांनी क्वेटा, ग्वादर, मस्तुंग, नोशकी आणि कलात यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये एकाच वेळी हल्ले चढवले आहेत. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत पाकिस्तानच्या (Pakistan) किमान 10 सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. क्वेटातील पोलीस ठाणी उद्ध्वस्त करण्यात आली असून तेथील सरकारी वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे.

Baloch Liberation Army
Pakistan Nuclear Policy: 'पाकिस्तानचा अणुबॉम्ब फक्त भारतासाठीच!' अण्वस्त्र धोरणावरुन नजम सेठींचा खळबळजनक दावा; पाकिस्तानी पत्रकारानं उघडलं देशाचं गुपित

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने रुग्णालयांमध्ये आणीबाणी घोषित केली असून मोबाइल सेवा आणि रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, चीनच्या मदतीने विकसित केल्या जाणाऱ्या ग्वादर बंदराजवळही बीएलएचे सैनिक पोहोचले असून तिथे पाकिस्तानी लष्करासोबत जोरदार चकमक सुरु आहे. संपूर्ण परिसरात गोळीबाराचा आवाज घुमत असून आकाशात धुराचे लोट दिसत आहेत.

Baloch Liberation Army
India vs Pakistan: हाय-व्होल्टेज क्लॅश, आज भारत- पाकिस्तान पुन्हा आमनेसामने! कुठे अन् किती वाजता पाहता येणार सामना?

बलुचिस्तानमधील ही परिस्थिती इतकी भीषण आहे की, बलूच नेते सरदार अख्तर मेंगल यांनी "आपल्या आयुष्यात कधीही अशी भयावह परिस्थिती पाहिली नाही," असे विधान केले. बलुचिस्तान हा भाग खनिजांनी समृद्ध असूनही तिथे मोठ्या प्रमाणावर गरिबी आणि मानवाधिकार उल्लंघनाच्या तक्रारी आहेत. बीएलए या आक्रमणाला स्वातंत्र्याची लढाई म्हणत आहे, तर पाकिस्तान सरकार याला दहशतवाद ठरवत आहे. क्वेटासारख्या राजधानीच्या शहरात बीएलएचे सैनिक उघडपणे फिरत असल्याने पाकिस्तानी लष्कराच्या कमकुवतपणावर जागतिक स्तरावर चर्चा सुरु झाली आहे. या घटनेने बलुचिस्तानमधील दशकांपासून सुरु असलेल्या संघर्षाला एका नव्या आणि अधिक हिंसक वळणावर आणून ठेवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com