Australia Crime: ऑस्ट्रेलियात पुन्हा एकदा चाकू हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. यावेळी सिडनीतील एका चर्चमध्ये सामूहिक प्रार्थनेदरम्यान एका व्यक्तीने बिशपवर चाकूने हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती प्रार्थना करताना बिशपवर चाकूने हल्ला करताना दिसत आहे. या हल्ल्यात बिशपसह इतर अनेक जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चाकू हल्ल्याच्या घटनेबाबत सिडनी पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, हल्ल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यात आणखी चार जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींमध्ये बिशपला वाचवणाऱ्यांचाही समावेश आहे.
वृत्तानुसार, बिशप मार मारी इमॅन्युएल हे वेकले येथील क्राइस्ट द गुड शेफर्ड चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना करत असताना एक व्यक्ती त्यांच्याजवळ आला आणि त्याने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. कोरोना काळात बिशपने खूप प्रसिद्धी मिळवली होती. त्या काळात, बिशपच्या ऑनलाइन फॉलोअर्समध्ये लक्षणीय वाढ झाली होती. दरम्यान, सिडनीतील एका शॉपिंग मॉलमध्ये सहा जणांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याच्या काही दिवसांतच ही घटना समोर आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.