90 टक्के कोल्ड ड्रिंक्समध्ये वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम स्वीटनरबाबत WHO चा इशारा, व्यक्त केला कॅन्सरचा धोका

अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने 1981 मध्ये असपार्टमला मान्यता देण्यात आली होती.
Aspartame Artificial Sweeteners
Aspartame Artificial SweetenersDainik Gomantak
Published on
Updated on

Aspartame Artificial Sweeteners: असपार्टम हा कृत्रिम स्वीटनर जगातील नव्वद टक्के कोल्ड ड्रिंक्समध्ये वापरला जातो. मात्र, त्याबाबत आता धोकादायक इशारा देण्यात आला असून, यातून कर्करोगाचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वॉशिंगटन पोस्टने याबाबत वृत्त दिले आहे.

जागतिक आरोग्य संघटना पुढील महिन्यात असपार्टमला कर्करोगजन्य पदार्थ म्हणून घोषित करणार असल्याची माहिती प्रसिद्ध वृत्तसंस्था रॉयटर्सने दिली आहे.

वॉशिंगटन पोस्टच्या अहवालानुसार, अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने 1981 मध्ये असपार्टमला मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर ते किती सुरक्षित आहे याबाबत पाचवेळा चाचणी करण्यात आली. त्यावेळी भारतासह नव्वद देशांनी त्याच्या वापराला मान्यता दिली. असपार्टममध्ये कॅलरीज नसल्या तरी ते साखरेपेक्षा दोशनेपट गोड आहे.

अन्न आणि औषध प्रशासनाने नियंत्रित करून दिलेल्या प्रमाणात असपार्टमच्या वापरला 2009 मध्ये परवानी दिली. 95 टक्के कार्बोनेटेड ड्रिंक्समध्ये असपार्टमचा वापर केला जातो. तसेच, 90 टक्के रेडीमेड चहामध्ये देखील याचा वापर केला जातो. अशी माहिती आहे. असपार्टम वापराचा स्पष्ट उल्लेख करावा अशी सक्ती FSSAI ने केली आहे.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या कर्करोग संबधित संशोधन करणाऱ्यांनी जुलैमध्ये असपार्टमला कर्करोगजन्य पदार्थ म्हणून घोषित करणार असल्याचे म्हटले आहे.

मे महिन्यात आरोग्य संघटनेच्या वतीने कृत्रिम स्वीटनर वापराबाबत गाईडलाईन दिली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com