Bill Gates: भविष्यात येणाऱ्या दुसऱ्या महामारीसाठी तयार रहा

बिल गेट्स यांनी मंगळवारी कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात आणि भविष्यातील साथीच्या रोगांच्या तयारीसाठी $150 दशलक्ष देणगी दिली.
Bill Gates
Bill GatesDainik Gomantak
Published on
Updated on

जगभरात कोरोनाचे संकट गडद होत चालले आहे. कोविड-19 महामारीमुळे जगभरातील लोक घाबरले आहेत. दरम्यान, बिल गेट्स यांनी भविष्यातील महामारीबाबत चिंता व्यक्त केली आहे. बिल गेट्स यांचा विश्वास आहे की भविष्यात कोरोना व्हायरसपेक्षाही वाईट परिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे.

गेट्स फाऊंडेशन आणि ब्रिटीश बायोमेडिकल धर्मादाय संस्था वेलकम यांनी मंगळवारी कोविड-19 (Covid-19) विरुद्धच्या लढ्यात आणि भविष्यातील साथीच्या रोगांच्या तयारीसाठी $150 दशलक्ष देणगी दिली. ही रक्कम Coalition for Epidemic Preparedness Innovation (CEPI) ला देण्यात आली आहे.

Bill Gates
US-Canada सीमेवर थंडीमुळे नवजात बालकासह भारतीय कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

कोरोना महामारीच्या वाढत्या उद्रेकादरम्यान, CEPI ला दान केलेली रक्कम कोविड संसर्गाविरुद्धच्या लढाईसाठी वापरली जाणार, अशी घोषणा करण्यात आली. यासोबतच भविष्यातील साथीच्या आजारांसाठीही संघटना तयारी करणार आहे. बिल गेट्स म्हणाले की, संपूर्ण जग वेगाने पसरणाऱ्या व्हायरसच्या आव्हानाला सामोरे जाण्याचा प्रयत्न करत आहे.

बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचे सह-संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, लसींमुळे बरेच लोक वाचले आहेत आणि त्याच्या संसर्गातून खूप लवकर बाहेर पडले आहेत. विकसनशील देशांना पाहिजे तितक्या लवकर लस मिळाली नाही, असेही ते म्हणाले.

बिल गेट्सचे असेही मत आहे की नवीन लस बनवणे पुरेसे नाही. ही लस सर्व लोकांपर्यंत पोहोचू शकते हे देखील आपण ठरवले पाहिजे. वेलकम डायरेक्टर आणि ब्रिटीश शास्त्रज्ञ जेरेमी फरार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आमच्यापैकी कोणाचाही विश्वास नाही की ओमिक्रॉन व्हेरिएंट कोरोनाचे शेवटचे प्रकार असेल.

त्यांनी देशातील सर्व सरकारांना (Governments) आपले योगदान वाढवण्याचे आवाहन केले. इबोला महामारीनंतर 2017 मध्ये स्थापन झालेल्या CEPI ने कोरोनाव्हायरस साथीच्या लढाईत मोठे योगदान दिले आहे. अनेक लस प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याचे ही सांगितले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com