भविष्यात येणाऱ्या महामारीला तोंड द्यावं लागेल: बिल गेट्स

मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी कोरोना महासाथीबाबत पुन्हा एकदा महत्त्वाचं विधान केलं आहे, त्यांनी असं म्हटलंय की, आणखी एक साथीचा रोग आता जवळ आला आहे.
Bill Gates
Bill GatesDainik Gomantak
Published on
Updated on

मायक्रोसॉफ्ट (Microsoft) कंपनीचे सहसंस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांनी कोरोना महासाथीबाबत (Corona epidemic) पुन्हा एकदा महत्त्वाचं विधान केलं आहे, त्यांनी असं म्हटलंय की, आणखी एक साथीचा रोग आता जवळ आला आहे. (Bill Gates has said that there will be another epidemic in the future)

Bill Gates
चीनची मदत करुन कर्जाच्या फंद्यात पडू नका

CNBCला दिलेल्या मुलाखतीमध्ये बिल गेट्स यांनी असे म्हटले की, भविष्यात येणारी ही महामारी कोरोना विषाणूच्या कुटुंबातील विषाणू सदस्यामुळे येणार नसून एका वेगळ्या संसर्गामुळे समोर येणार आहे, अशीही स्पष्टोक्ती दिली आहे. पुढे त्यांनी कोरोना विषाणूबाबत (Corona virus) बोलताना म्हटलं आहे की, लस अधिक प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे आता कोरोनापासून गंभीर संसर्ग होण्याचा धोका आता फक्त "नाटकीयरीत्या कमी झाला आहे."

बिल गेट्स यांनी आधीच डिसेंबरमध्ये ओमिक्रॉन लाटेबाबतचा इशारा दिला होता. ते 'गेट्स नोट्स' या ब्लॉगच्या माध्यमातून नियमितपणे हवामान बदल तसेच जागतिक आरोग्याच्या समस्येवर चर्चा करत असतात. बिल गेट्स यांनी आपल्या पूर्वीच्या पत्नी मेलिंडा यांच्यासोबत 'बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन'ची स्थापना केली होती. हे फाऊंडेशन आरोग्य सेवा आणि अविकसित देशांमध्ये असलेली भीषण गरिबी कमी करण्याच्या प्रयत्नांसाठी झटत आहे.

Bill Gates
Pakistan: मासेमारीच्या आरोपात पाकिस्तानने पकडले भारताचे 31 मच्छिमार

आपल्याला आणखी एका साथीच्या रोगाला (Disease) तोंड द्यावं लागणार आहे." असं बिल गेट्स यांनी चर्चा सत्रादरम्यान म्हटल आहे. मात्र, पुढच्या वेळी रोगास कारणीभूत ठरणारा घटक वेगळा असणार आहे. ते पुढे म्हणाले की, गंभीर रोगाचा धोका हा प्रामुख्याने वृद्ध आणि लठ्ठपणा किंवा मधुमेह असणाऱ्यांना जास्त असतो. मात्र, आता कोरोनाबाबत मोठ्या प्रमाणात तो धोका कमी होताना दिसून येत आहे.

त्यांनी असंही म्हटलं आहे की, 2022 च्या मध्यापर्यंत जगातील 70% लोकसंख्येचे लसीकरण करण्याचे WHO चे उद्दिष्ट, खरं तर हे खूप उशीरा ठरणार आहे. पण, रोगाची तीव्रता कमी झाल्यामुळे ते आशावादी आहेत. सध्या तरी जागतिक लोकसंख्येपैकी सुमारे 61 टक्के लोकांना COVID-19 लसीकरणामधील एक डोस मिळालेला आहे.

Bill Gates
इम्रान सरकारने काढला अजब फतवा, लष्करावर टीका केल्यास होणार 5 वर्षांची शिक्षा

मेसेंजर RNA (mRNA) हे तंत्रज्ञान आरोग्यसेवा सुधारण्यासाठी नक्कीच मदत करेल. मात्र, पुढे येऊ पाहणाऱ्या महामारीसाठी तयार होण्याची किंमत जास्त असणार नाही. असंही ते यावेळी म्हणाले आहेत, कारण हे काही ग्लोबल वार्मिंगसारखे नाही. मात्र, हो! जर आपण तर्कास प्रमाण मानत असू तर आपण पुढच्या वेळी लवकरच यातून बाहेर पडू शकतो. असा ही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. गेट्स यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये भारताने लसीकरणाचा 100 कोटींचा टप्पा पार केल्यानंतर लसीकरण मोहिमेचं कौतुक देखील केलं होतं. आणि भारताच्या या प्रयत्नांबद्दल त्यांनी कौतुकोद्गार काढले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com