चीनची मदत करुन कर्जाच्या फंद्यात पडू नका

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी चीनसोबतच्या सर्व संबंधांबाबत इतर देशांना इशारा दिला आहे.
Minister of External Affairs of India S. Jaishankar
Minister of External Affairs of India S. Jaishankar Dainik Gomantak

भारताचे परराष्ट्र मंत्री (Minister of External Affairs of India) एस जयशंकर (S. Jaishankar) यांनी चीनसोबतच्या (Chaina) सर्व संबंधांबाबत इतर देशांना (Relations with China) इशारा दिला आहे. ते असे म्हणाले की, चीनच्या भानगडीत पडून कोणत्याही देशाने कर्जात बुडण्याची चूक करू नये. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) मोठ्या संख्येने सैन्य तैनात करून कराराचे उल्लंघन केले आहे, आणि त्यामुळेच भारतासोबतचे चीनचे संबंध कठीण काळातून जात आहेत. चीनची मदत स्वीकारल्यानंतर तुम्ही रचलेल्या जाळ्यात अडकाल, असा इशारा त्यांनी इतर देशांना दिला आहे. (Indian Foreign Minister S Jaishankar has warned other countries about all relations with China)

Minister of External Affairs of India S. Jaishankar
काँग्रेसला वगळून मोदी विरोधातली लढाई यशस्वी नाही; यशोमती ठाकूर

यादरम्यान, जयशंकर यांनी म्हटले आहे की, 'सीमेची स्थिती दोन्ही देशांमधील संबंधांची स्थिती निश्चित करणार आहे. जयशंकर यांनी शनिवारी म्युनिक सुरक्षा परिषदेत 'इंडो-पॅसिफिकमधील प्रादेशिक सुव्यवस्था आणि सुरक्षा' या विषयावरील चर्चेत भाग घेताना हे वक्तव्य केले आहे. त्यांनी हे ऑस्ट्रेलियन (Australia) आणि जपानी (Japan) समकक्ष मारिस पायने आणि योशिमासा हयाशी यांच्या भेटीदरम्यान सांगितले आहे.

45 वर्षे सीमेवर शांतता

मे 2020 मध्ये सुरू झालेल्या लष्करी अडथळ्याचा संदर्भ देताना भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणाले आहेत की, "भारताची चीनशी समस्या आहे आणि समस्या अशी आहे की 1975 पासून 45 वर्षे सीमेवर शांतता होती, स्थिर सीमा व्यवस्थापन होते, कोणतीही सैनिकी जीवितहानी झालेली नाही. ते म्हणाले, 'आता हे बदलले आहे कारण आम्ही चीनसोबत सीमेवर किंवा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर लष्करी फौजा तैनात न करण्याचे करार केले होते... पण चीनने त्या करारांचे सरळ सरळ उल्लंघन केले आहे.

Minister of External Affairs of India S. Jaishankar
Jammu And Kashmir: सुरक्षा दलांना मोठे यश, डोडातून एक दहशतवादी गजाआड

लडाखमधील बंदमुळे परिस्थिती आणखी बिघडली

साहजिकच, सीमा परिस्थिती हीच आपल्या संबंधांची स्थिती ठरवेल, असे जयशंकर म्हणाले. परराष्ट्र मंत्री म्हणाले, वरवर पाहता सध्या चीनसोबतचे संबंध अत्यंत कठीण टप्प्यातून आणि वेळेतुन जात आहेत.' पुढे ते म्हणाले की, भारताचे पाश्चात्य देशांशी जून 2020 पूर्वीचे संबंध खूप चांगले होते. पूर्व लडाखमध्ये पॅंगॉन्ग लेक भागात झालेल्या हिंसक चकमकीनंतरच भारत आणि चिनी सैन्यादरम्यान सीमेवर संघर्ष सुरू झाला आहे.

सीमेवर सैन्य आणि शस्त्रास्त्रांची तैनाती वाढवली आहे

यावेळी, दोन्ही बाजूंनी हळूहळू त्यांच्या सैन्याची आणि शस्त्रांची तैनाती वाढवली आहे. 15 जून 2020 रोजी गलवान व्हॅलीमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर देखील तणावात वाढ झालेली आहे. जयशंकर यांनी MSC मधील इंडो-पॅसिफिकवरील चर्चेत भाग घेतला, त्या मागील उद्देश युक्रेनवर नाटो देश आणि रशिया यांच्यातील वाढत्या तणावावर चर्चा विस्तृत करणे असा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com