Russia-Ukraine War: युक्रेनने रशियाच्या 'या'शहरावर केला आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; पुतीन यांना झटका!

Russian City Belgorod: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला 2 वर्षे पूर्ण होण्याआधीच युक्रेनने रशियाच्या बेलगोरोड शहरावर अत्तापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला.
Russia-Ukraine War
Russia-Ukraine WarDainik Gomantak
Published on
Updated on

Ukraine Biggest Attack On Russian City Belgorod:

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला 2 वर्षे पूर्ण होण्याआधीच युक्रेनने रशियाच्या बेलगोरोड शहरावर अत्तापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला. एएफपीच्या वृत्तानुसार, रशियामध्ये युक्रेनच्या हवाई हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 18 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. हा हल्ला इतका भीषण होता की, आजूबाजूच्या इमारती आणि वाहनांचे तुकडे झाले.

युक्रेनने रशियाच्या सीमेपासून 30 किलोमीटर आत असलेल्या बेलगोरोड शहरावर हा हल्ला केला आहे. 28 फेब्रुवारी रोजी युक्रेनवर रशियाच्या हल्ल्याला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्याआधी युक्रेनने हा भीषण हल्ला करुन रशियाला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की, झेलेन्स्कीने अद्याप पराभव स्वीकारलेला नाही.

दरम्यान, सोशल मीडियावर (Social Media) शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये युक्रेनियन सीमेजवळील शहरातील ढिगाऱ्यांनी वेढलेले एक नष्ट झालेले स्टोअरफ्रंट दाखवले आहे. एकाने जवळच ब्लँकेटने झाकलेला मृतदेह दाखवला. बेलगोरोड या रशियन शहरावर गुरुवारी झालेल्या हवाई हल्ल्यात किमान पाच जण ठार आणि 18 जण जखमी झाले, असे प्रदेशाच्या गव्हर्नरने सांगितले.

गव्हर्नर व्याचेस्लाव ग्लॅडकोव्ह म्हणाले की, "प्राथमिक माहितीनुसार, बेलगोरोडमध्ये एका लहान मुलासह पाच जण ठार तर 18 जण जखमी झाले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले जात आहे. सर्व आवश्यक मदत पुरवली जात आहे.''

Russia-Ukraine War
Russia-Ukraine War: युक्रेनमध्ये सत्तापालट होणार? झेलेन्स्की यांची युक्रेनियन आर्मीच्या जनरलला धमकी!

रशियाने युक्रेनियन 14 रॉकेट पाडल्याचा दावा केला

रशियन संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, त्यांनी या भागात 14 युक्रेनियन रॉकेट पाडले आहेत, जे RM-70 मल्टिपल रॉकेट लाँचर सिस्टमद्वारे उडवण्यात आले होते. बेलगोरोड शहर युक्रेनच्या सीमेपासून सुमारे 30 किलोमीटर (19 मैल) अंतरावर आहे आणि मॉस्कोच्या म्हणण्यानुसार कीव सैन्याने केलेल्या अंदाधुंद गोळीबाराचा वारंवार फटका बसला आहे.

डिसेंबर महिन्यात युक्रेनियन हल्ल्यात 25 लोक मारले गेल्यानंतर रशियन अधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यात शहरातून काही रहिवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली होती. रशियाने (Russia) फेब्रुवारी 2022 मध्ये युक्रेनविरुद्ध युद्ध सुरु केल्यापासून सुमारे 400 मुलांसह शेकडो लोक आधीच विस्थापित झाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com