Bhutan: भूटान के प्रिंस जिग्मे नामग्याल वांगचुक हे पहिले डिजिटल नागरिक बनले आहेत. याबाबतची माहिती भूटानच्या प्रशासनाने दिली आहे. प्रिंस जिग्मे नामग्याल वांगचुक हे फक्त ७ वर्षांचे आहेत आणि देशाचे पहिले डिजिटल नागरिकदेखील आहेत.
भूटानने 2021 मध्ये नॅशनल डिजिटल आयडेंटी प्रकल्पाची सुरुवात केली आहे. याअंतर्गत 8 वर्षावरील सर्वांची माहिती गोळा केली जात आहे. या माहितीला बायोमॅट्रीकद्वारे अॅक्सेस केले जाऊ शकते. आधारकार्डसारखी याची यंत्रणा असल्याचे पाहायला मिळत आहे. डिजिटल द्वारे व्यक्तीची संपूर्ण माहिती एकाच ठिकणी गोळा केली जाते.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल डिजिटल आयडेंटीची सुरुवात खाजगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही क्षेत्रात सेवा देण्याच्या पद्धतीत बदल करण्याच्या प्रक्रियेतील पहिले पाऊल आहे.
सेल्फ सॉवरेन आइडेंटिटी मॉडलवर ही यंत्रणा काम करते. याद्वारे कोणाला आपल्या माहितीचा किती उपयोग करुन द्यायचा नागरिकां( Citizen)ना हक्क मिळतात.
दरम्यान, प्रिंस जिग्मे नामग्याल वांगचुक यांना जन्माबरोबरच क्राउन प्रिंन्स ही उपाधी मिळाली आहे. त्यांचा जन्म 5 फेब्रुवारी 2016 ला झाला होता. इतक्या कमी वयात क्राउन प्रिंस बनणारे ते पहिले व्यक्ती आहेत. ते भूटानचे सहावे प्रिंन्स असणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.