Twitter Down Latest Updates
Twitter Down Latest UpdatesDainik Gomantak

Twitter Down : 'ऑफिसला येत असाल, तर परत जा...'; म्हणून एलन मस्कने कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी

Twitter Down Latest Updates : गेल्या दोन आठवड्यांपासून ट्विटर ऑफिसमध्ये बरेच काही घडत आहे.
Published on

Twitter Down Latest Updates : गेल्या दोन आठवड्यांपासून ट्विटर ऑफिसमध्ये बरेच काही घडत आहे. एलन मस्क मालक बनताच सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह अनेक बड्या लोकांना काढून टाकण्यात आले आणि तेव्हापासून ट्विटर मध्ये लोकांना काढण्याचे जणू सत्रच सुरू झाले आहे. दरम्यान, ट्विटर डाऊन झाल्याची बातमी समोर आली आहे. 04 नोव्हेंबरला पहाटे 3 वाजल्यापासून वापरकर्त्यांना ट्विटर वापरण्यात अडचणी येत आहेत.

DownDetector च्या मते, आतापर्यंत सुमारे 200 लोकांनी ट्विटर डाऊन झाल्याची तक्रार केली आहे. बहुतांश युजर्सना ट्विटरच्या वेबसाइटवर समस्या येत आहेत. फक्त 6 टक्के लोकांनी ट्विटर अॅपबद्दल तक्रार केली असून सर्व वापरकर्त्यांना Twitter सह समस्या येत नाहीत. फक्त काही वापरकर्ते लॉगिनबद्दल चिंतित आहेत. ट्विटर वेबसाइटवर प्रवेश केल्यावर, वापरकर्त्यांना समथिंग वेंट रॉंगचा संदेश दिसत आहे. (Twitter Down Latest Updates)

ट्विटर डाऊन झाल्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स शेअर करत आहेत. ट्विटर डाऊन असताना मला पुस्तक वाचायला आवडेल असे कोणीतरी म्हणत आहे. अनेक युजर्सने असेही म्हटले आहे की, जर ट्विटर डाऊन असेल तर तुम्ही मला सिग्नलवर मेसेज करू शकता.

एलन मस्क मालक बनल्यानंतर ट्विटरवर मोठ्या प्रमाणात लोकांना काढून टाकण्याचा प्रकार सुरू आहे. ट्विटरमधील कर्मचार्‍यांची काढणी आजपासून म्हणजेच 4 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. कंपनीच्या पायाभूत सुविधांच्या खर्चाची किंमत कमी करून मस्कला सुमारे $82 बिलियनची बचत करायची आहे.

एका अहवालानुसार, मस्कने ट्विटर इंकच्या नवीन व्यवस्थापकांना पायाभूत सुविधांची किंमत कमी करण्यासाठी पावले उचलण्यास सांगितले आहे. त्यांनी म्हटले आहे की त्यांना ट्विटरचा खर्च वर्षाला $1 बिलियनने कमी करायचा आहे. खर्चात कपात करण्यासाठी मस्कने या योजनेला 'डीप कट्स प्लॅन' असे नाव दिले आहे. त्यामुळे मस्कने कर्मचाऱ्यांना चक्क घरी परतायला सांगितले. म्हणाला, 'ऑफिसला येत असाल, तर घरी परत जा'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com