Bangladesh Violence: पेट्रोलचे 5 हजार मागितले अन् हिंदू तरुणाला कारखाली चिरडले, BNP नेत्यानं घेतला जीव; बांगलादेशात पुन्हा रक्ताची होळी

Hindu Killed in Bangladesh: बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू समुदायावर होणाऱ्या अत्याचारांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये.
Hindu Killed in Bangladesh
Hindu Killed in BangladeshDainik Gomantak
Published on
Updated on

Hindu Killed in Bangladesh: बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू समुदायावर होणाऱ्या अत्याचारांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. राजबाडी जिल्ह्यात एका पेट्रोल पंप कर्मचाऱ्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या (BNP) एका बड्या नेत्याला पेट्रोलचे पैसे मागितले म्हणून हिंदू तरुणाला आपल्या आलिशान कारखाली चिरडून मारले. या घटनेमुळे स्थानिक हिंदू बांधवांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय रिपन साहा हा 'करिम फिलिंग स्टेशन'मध्ये पेट्रोल पंप कर्मचारी म्हणून काम करत होता. शुक्रवारी पहाटे 4:30 च्या सुमारास राजबाडी जिल्हा बीएनपीचा माजी कोषाध्यक्ष आणि जूबो दलचा माजी जिल्हाध्यक्ष अबुल हाशेम सुजन (55) हा आपल्या काळ्या रंगाच्या 'लँड क्रूझर' जीपमधून पंपावर आला. त्याने गाडीत 5000 टका किमतीचे ऑक्टेन भरले, मात्र पैसे न देताच तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

Hindu Killed in Bangladesh
Bangladesh Violence: बांगलादेशात इस्लामिक कट्टरपंथीयांचं पाशवी कृत्य! हिंदू कुटुंबावर हल्ला करुन घर दिलं पेटवून; जीव वाचवण्यासाठी धडपड VIDEO

पैसे मागितले आणि मृत्यू मिळाला

रिपन साहाने प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत गाडी अडवली आणि पेट्रोलचे पैसे मागितले. यामुळे संतप्त झालेल्या अबुल हाशेम सुजन आणि त्याचा ड्रायव्हर कमल हुसेन यांनी रिपनला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यानंतर सुजनने ड्रायव्हरला गाडी वेगाने चालवण्यास सांगितले आणि रिपन साहा याला गाडीखाली चिरडले. गाडीचे चाक रिपनच्या डोक्यावरुन आणि चेहऱ्यावरुन गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या क्रूर घटनेनंतर रिपनचा मृतदेह ढाका-खुलना हायवेवर रक्ताच्या थारोळ्यात पडून होता.

Hindu Killed in Bangladesh
Bangladesh Violence: 'पुरावा नसताना हिंदू तरुणाचा बळी घेतला', दीपू दासच्या हत्येवर शेख हसीनांचा संताप; बांगलादेशातील कट्टरपंथीयांवर साधला निशाणा

सीसीटीव्ही फुटेजने गुपित उघड

या सर्व घटनेचा थरार पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसते की, सुजनची गाडी पंपावर येते, रिपन पैसे मागतो आणि त्यानंतर त्याला चिरडून गाडी वेगाने पसार होते. या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी सदर उपजिल्ह्यातील बारो मुरारीपूर गावातील घरातून अबुल हाशेम सुजनला अटक केली. तसेच, चालक कमल हुसेन यालाही ताब्यात घेण्यात आले. राजबाडी सदर पोलीस ठाण्याचे ओसी खोंडकर जियाउर रहमान यांनी या अटकेला दुजोरा दिला.

Hindu Killed in Bangladesh
Bangladesh Violence: बांगलादेशात माणुसकीला काळिमा! हिंदू तरुणाची निर्घृण हत्या, मृतदेह झाडाला टांगून जाळला Watch Video

हिंदू समुदायात दहशतीचे वातावरण

पोलिसांनी या घटनेला 'पेमेंट वाद' म्हटले असले, तरी स्थानिक हिंदू समुदाय आणि मानवाधिकार संघटना याला सांप्रदायिक हिंसाचाराचा भाग मानत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशात हिंदूंना लक्ष्य केले जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. दरम्यान, बीएनपीचे जिल्हा निमंत्रक खैरुल अनाम बकुल यांनी या घटनेपासून हात झटकले असून सुजनने बराच काळ आधीच पक्षाचा राजीनामा दिला असल्याचे म्हटले आहे. मात्र, आरोपी राजकीय पाठबळ असलेला असल्याने रिपन साहाला न्याय मिळणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com