Bangladesh: रेल्वे क्रॉसिंगवर भीषण अपघात, ट्रेनने कारला नेले फरफटत; 11 जण ठार

ही घटना चट्टोग्रामच्या मिरशारे उपजिल्हामधील आहे. घटनेच्या वेळी रेल्वे क्रॉसिंगचे गेट उघडे होते, त्यामुळे चालकाचे ट्रेनकडे लक्ष नव्हते
Bangladesh Train Accident
Bangladesh Train AccidentTwitter
Published on
Updated on

Bangladesh Train Accident: बांगलादेशमध्ये ट्रेनच्या धडकेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांचा समावेश आहे. हे सर्व लोक मायक्रोबसमधून धबधबा पाहून परतत होते. ही घटना चट्टोग्रामच्या मिरशारे उपजिल्हामधील आहे. घटनेच्या वेळी रेल्वे क्रॉसिंगचे गेट उघडे होते, त्यामुळे चालकाचे ट्रेनकडे लक्ष नव्हते. अपघातानंतर ट्रेनने बसला एक किलोमीटरपर्यंत फरफटट नेले.

मृत्यू झालेल्या 9 प्रवाशांची ओळख पटली असल्याचे पोलिसांनी सांगितले. सर्व मृत हे हातहजारी उपजा येथील अमन बाजार परिसरात असलेल्या आर अँड जे प्लस नावाच्या कोचिंग सेंटरचे विद्यार्थी आणि शिक्षक होते. जिसान, साजिब, राकीब आणि रेडवान अशी मृत्यू झालेल्या चार शिक्षकांची नावे आहेत. उर्वरित पाच जणांची नावे हिशाम, आयत, मारुफ, तस्फिर आणि हसन विद्यार्थी अशी आहेत. हे सर्वजण एसएससी आणि बारावीची तयारी करत होते.

हे 6 जण जखमी झाले आहेत...

सहा जखमींमध्ये मायक्रोबस हेल्पर तौकीद इब्न शॉन, इयत्ता 11 वीचे विद्यार्थी मोहम्मद माहीम, तन्वीर हसन हृदोय, मोहम्मद इमोन आणि एसएससीचे उमेदवार तश्मीर पाबेल आणि मोहम्मद सायकोत यांचा समावेश आहे.

Bangladesh Train Accident
खांडेपारमध्ये घराला कारची जोरदार धडक

अचानक ट्रेन येतांना दिसली

हातजारी उपजिल्हा निर्बाही अधिकारी (UNO) शाहिदुल आलम यांनी सांगितले की, हा अपघात दुपारी 12.45 च्या सुमारास झाला. ही मायक्रोबस रेल्वे क्रॉसिंगवरून जात असताना समोरून चट्टोग्रामला जाणारी प्रभाती एक्स्प्रेस गाडी आली. या घटनेत बसला ट्रेनने धडक दिली.

मायक्रोबसमधील विद्यार्थी आणि शिक्षक मिरसराय येथील खयाचरा धबधब्यावरून परतत असल्याचे सांगण्यात आले. दुपारच्या सुमारास रेल्वे अधिकाऱ्यांनी या घटनेच्या चौकशीसाठी रेल्वेचे विभागीय परिवहन अधिकारी (पूर्व विभाग) अन्सार अली यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली. रेल्वेचे (पूर्व विभाग) महाव्यवस्थापक जहांगीर हुसेन यांनी या घटनेला दुजोरा दिला. समितीला लवकरात लवकर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

चौकशी समिती स्थापन केली

विभागीय कार्यकारी अभियंता-1 अब्दुल हमीद, विभागीय यांत्रिक अभियंता झाहीद हसन, रेल्वे संरक्षण दलाचे कमांडंट रेझानुर रहमान आणि विभागीय वैद्यकीय अधिकारी अन्वर हुसेन हे समितीतील अन्य चार सदस्य आहेत. मिरसराय रेल्वे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी (OC) नाझिम उद्दीन यांनी सांगितले की, 'रेल्वे पोलिसांनी रेल्वे गेटमन सद्दाम हुसेन याला अटक केली. मिरसरे अग्निशमन दलाने घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला.'

Bangladesh Train Accident
क्षमतेहून जास्त माल भरलेल्या ट्रकमुळे अपघात!

ट्रेन एक किलोमीटर खेचली

मायक्रोबसमधील अन्य तीन प्रवाशांची सुटका करण्यात आली. त्यांना चट्टोग्राम मेडिकल कॉलेज रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, खयाचरा वॉटर फॉल्स पाहून ते परतीच्या वाटेवर असताना ढाकाहून जाणारी प्रोभाती एक्स्प्रेस ट्रेन त्यांच्या मायक्रोबसला धडकली आणि सुमारे एक किलोमीटरपर्यंत फरफटत गेली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com