Overloaded Truck in Goa
Overloaded Truck in GoaDainik Gomantak

क्षमतेहून जास्त माल भरलेल्या ट्रकमुळे अपघात!

सतर्कतेची गरज : पोलिस, वाहतूक खात्याचे दुर्लक्ष, चेकपोस्ट कुचकामी, अपघातांचे सत्र
Published on

पाळी : क्षमतेपेक्षा जास्त माल लादून धोकादायक स्थितीत वाहतूक करणाऱ्या ट्रकांकडे पोलिस आणि वाहतूक खात्याने साफ दुर्लक्ष केले असून बिनधास्तपणे वाहतूक करणाऱ्या या ट्रकांमुळे अपघातांचे सत्र सुरू आहे, मात्र त्याकडे सुरक्षा यंत्रणा काणाडोळा करीत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. विशेषतः रेती व खडीची वाहतूक करणाऱ्या कर्नाटक तसेच महाराष्ट्र राज्यातील ट्रकांकडून ही बिनधास्त वाहतूक सुरू आहे. परराज्यातून गोव्यात येणाऱ्या या ट्रकांवर कोणाचेच नियंत्रण नसल्याने हे चेकपोस्ट कुचकामी ठरले असल्याचाही आरोप होत आहे.

खडी व रेतीची अवैध वाहतूक परराज्यातून केली जात असून सत्तरी तसेच दोडामार्ग येथील चेकपोस्टवरुन कसा काय ट्रकांना गोव्यात प्रवेश दिला जातो, असा सवाल केला जात आहे. रेती, खडी तसेच चिऱ्यांच्या वाहतुकीबरोबरच इतर वस्तुंची वाहतूक क्षमतेपेक्षा ट्रकात भरून केली जात आहे.

बऱ्याचदा हे ट्रकचालक दारुच्या नशेत असल्याचेही आढळून आले असून दोन दिवसांपूर्वी सुर्ल - पाळी येथे क्षमतेपेक्षा जास्त माल घेऊन चाललेल्या एका ट्रकमुळे धोका निर्माण झाल्याने तेथील ग्रामस्थांनी ट्रक अडवून जाब विचारला होता, त्यावेळेला हातापाया पडून संबंधित ट्रकचालकाने तेथून ट्रकसह पोबारा केला.

Overloaded Truck in Goa
गोव्यातील 39 गावे अद्यापही 4-जी नेटवर्क सेवेपासून वंचित!

क्षमतेपेक्षा जास्त माल घेऊन वाहतूक करणाऱ्या ट्रकांना राज्याच्या सीमेवरील चेकपोस्टवरून कसा काय प्रवेश दिला जातो, असा सवाल उपस्थित होत आहे. खडी, चिरे तसेच इतर साहित्य क्षमतेपेक्षा जास्त भरून ट्रकांतून वाहतूक केली जात आहे, मग वाहतूक खाते आणि पोलिस काय झोपा काढत आहेत, असाही सवाल उपस्थित होत आहे. हेल्मेट नसले की तालाव देणारे पोलिस अशाबाबतीत कसे काय चिडिचूप राहतात.

बेकायदा वाहतुकीला अभय

क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अपघात होत आहेत. स्वतःबरोबरच इतरांनाही धोका निर्माण करणाऱ्या या ट्रकांना आडकाठी आणण्याची आवश्‍यकता आहे. पोलिस तसेच वाहतूक खात्याच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी त्वरित लक्ष घालून अशी बेकायदा वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांवर कडक कारवाई करण्याची मागणीही होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com