Pani puri
Pani puri Dainik Gomantak

नेपाळ मधील काही भागात पाणीपुरीच्या विक्रीवर बंदी

पाणीपुरीत वापरण्यात येणाऱ्या पाण्यात कॉलराचे जीवाणू आढळून आल्याचा दावा शहर प्रशासनाकडून करण्यात आला.
Published on

कॉलराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने काठमांडू खोऱ्यातील ललितपूर मेट्रोपॉलिटन सिटी (LMC) मध्ये पाणीपुरीच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. आतापर्यंत येथे कॉलराचे 12 रुग्ण आढळून आले आहेत. शनिवारी शहरात पाणीपुरी विक्री व वितरणावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.

Pani puri
South Africa च्या नाइट क्लबमध्ये 17 जणांचा संशयास्पद मृत्यू

पाणीपुरीत वापरण्यात येणाऱ्या पाण्यात कॉलराचे जीवाणू आढळून आल्याचा दावा शहर प्रशासनाकडून करण्यात आला. शहर पोलीस प्रमुख सीताराम हाचेथू यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गजबजलेल्या भागात आणि कॉरिडॉर भागात पाणीपुरीची विक्री बंद करण्यात आली आहे.

Pani puri
G7 शिखर परिषदेपूर्वी रशियाने कीववर केला बॉम्ब हल्ला, 7 वर्षांच्या मुलीसह 4 जण जखमी

आरोग्य आणि लोकसंख्या मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, काठमांडू व्हॅलीमध्ये कॉलराच्या रुग्णांची एकूण संख्या 12 वर पोहोचली असून आणखी सात जणांना कॉलराची लागण झाली आहे. एपिडेमिओलॉजी आणि रोग नियंत्रण विभागाचे संचालक चुमनलाल दास यांच्या म्हणण्यानुसार, काठमांडू महानगरात कॉलराची पाच प्रकरणे आणि चंद्रगिरी नगरपालिका आणि बुधानीलकंठा नगरपालिकेत प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.

दरम्यान, आरोग्य आणि लोकसंख्या मंत्रालयाने लोकांना कॉलराची लक्षणे दिसल्यास तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात जाण्याचे आवाहन केले आहे. विशेषत: उन्हाळा आणि पावसाळ्यात अतिसार, कॉलरा आणि इतर जलजन्य आजारांचा फैलाव होत असल्याने सर्वांनी सतर्क राहण्याची विनंती मंत्रालयाने केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com