South Africa च्या नाइट क्लबमध्ये 17 जणांचा संशयास्पद मृत्यू

स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहावर जखमांच्या कोणत्याही स्पष्ट खुणा नाहीत.
South Africa
South AfricaDainik Gomantak
Published on
Updated on

दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) दक्षिणेकडील इस्ट लंडनमधील (East London) एका नाइट क्लबमध्ये (Night Club) रविवारी सुमारे 17 जणांचे संशयास्पद मृतदेह आढळले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह आढळले सर्वजण तरून आहेत.

प्रांतीय पोलिस प्रवक्ते ब्रिगेडियर थेंबिन्कोसी किनाना माहिती दिली की, आम्हांला 17 जणांच्या मृत्यूबाबत एक तक्रार मिळाली आहे. इस्ट लंडनमधील सीनरी पार्क येथील एका नाइट क्लबमध्ये हे मृतदेह संशयास्पदरित्या आढळले आहेत. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. मृत्यू झालेल्या सर्वाचं वय सुमारे 18 ते 20 वर्षादरम्यान आहे.

या 17 जणांच्या मृत्यूमागे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. घटनास्थळी दाखल झालेले सुरक्षा विभागाचे अधिकारी उनती बिनकोस यांनी स्पष्ट सांगितलं आहे की, चेंगराचेंगरीमुळे या लोकांचा मृत्यू झाला असं सांगता येणार नाही, कारण मृतांच्या शरीरावर कोणत्याही जखमांच्या कोणत्याही खुणा नाहीत.

मृतांच्या शरीरावर जखमांच्या खुणा नाहीत
स्थानिक वृत्तपत्रा 'डिस्पॅचलाइव'च्या (DispatchLive) रिपोर्टनुसार, 'नाईट क्लबमध्ये टेबल, खुर्च्या आणि जमिनीवर मृतदेह पडलेले होते. या मृतदेहांवर जखमांच्या कोणत्याही खुणा आढळलेल्य नाहीत.' सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या घटनास्थळाच्या फोटोंमध्येही मृतांच्या शरीरीवर जखमा दिसत नाहीत.

* नाईट क्लबच्या बाहेर जमलेल्या लोकांनी दिली माहीती
ज्या पालकांची मुले घरी झोपली नाहीत ते पालक येथे जमले आहेत आणि त्यांना त्यांच्या मुलांना शोधण्यासाठी नाईट क्लबमध्ये प्रवेश करायचा आहे. नाईट क्लबबाहेर लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. या नाइट क्लबमध्ये हायस्कूलच्या परीक्षिनंतर पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com