Viral Video: अमेरिकेतील बाल्टिमोरमध्ये मोठा अपघात, मालवाहू जहाज पुलाला धडकले; अनेक वाहने नदीत पडली

Baltimore Bridge: अमेरिकेतील बाल्टिमोरमधील 'फ्रान्सिस स्कॉट की ब्रिज'ला कंटेनरने भरलेले एक मोठे जहाज मंगळवारी पहाटे धडकले.
Baltimore Bridge
Baltimore BridgeDainik Gomantak

Baltimore Bridge: अमेरिकेतील बाल्टिमोरमधील 'फ्रान्सिस स्कॉट की ब्रिज'ला कंटेनरने भरलेले एक मोठे जहाज मंगळवारी पहाटे धडकले. धडकेनंतर पुलाचा मोठा भाग तुटून नदीत पडला. अपघाताच्या वेळी पुलावर अनेक वाहने आणि लोक उपस्थित होते, असे स्थानिक माध्यमांनी सांगितले. वृत्तसंस्था रॉयटर्सने वृत्त दिले आहे की, बाल्टिमोर अग्निशमन विभागाने पूल कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी होण्याची भीती व्यक्त केली आहे. बचावकार्य सुरु आहे. पटापस्को नदीवरील हा पूल 1977 मध्ये बांधण्यात आला होता.

दरम्यान, बाल्टिमोर अग्निशमन विभागाचे संचालक केविन कार्टराईट यांनी रॉयटर्सला सांगितले की, “आम्हाला 1:30 च्या सुमारास 911 वर अनेक कॉल आले की, बाल्टिमोरमधील की ब्रिजला जहाज धडकले आहे, ज्यामुळे पूल कोसळला आहे. सध्या या अपघातात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता असून नदीत सात जणांचा शोध सुरु आहे. बाल्टिमोरचे महापौर ब्रँडन स्कॉट यांनीही पूल कोसळल्याची दखल घेतली. आपत्कालीन विभागाच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी तात्काळ पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. फ्रान्सिस स्कॉट की ब्रिज हा वॉशिंग्टन मेट्रोपॉलिटन रीजनमधी एक महत्त्वाचा ट्रांसपोर्टेशन लिंक आहे, कारण तो वॉशिंग्टन, डीसी मधील जॉर्जटाउनला आर्लिंग्टन, व्हर्जिनियामधील रॉस्लिनला जोडतो.

Baltimore Bridge
America Crime: अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीवर पुन्हा हल्ला; रेस्टॉरंटबाहेर हाणामारीत मृत्यू

दुसरीकडे, हा पूल अमेरिकेचे राष्ट्रगीत लिहिणाऱ्या फ्रान्सिस स्कॉट यांना समर्पित आहे. मालवाहू जहाजाची लांबी 948 फूट असल्याचे सांगण्यात येत आहे. या धडकेनंतर जहाजही बुडाले. अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये जहाज पुलाला धडकताना दिसत आहे. टक्कर झाल्यानंतर जहाजाला आग लागली आणि 'फ्रान्सिस स्कॉट्स ब्रिज'चा एक भाग नदीत कोसळला. या पुलाची लांबी 3 किमी (1.6 मैल) आहे. दाली नावाच्या जहाजावर सिंगापूरचा ध्वज आहे. हे जहाज ग्रेस ओशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मालकीचे असल्याचे सांगितले जाते, ज्याचे व्यवस्थापन सिनर्जी मरीन ग्रुपकडे होते.

Baltimore Bridge
America Crime News: अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये बंदूकधाऱ्यांची दहशत, रॅपिड फायरिंगमध्ये 4 जणांचा मृत्यू

दरम्यान, हे जहाज श्रीलंकेला जात होते. मात्र, अपघाताच्या वेळी पुलावर किती लोक आणि वाहने होती हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मेरीलँड वाहतूक प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, पुलावरील अपघातानंतर सर्व लेन बंद करण्यात आल्या असून वाहतूक वळवण्यात आली आहे. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, ग्रेस ओशन प्रायव्हेट लिमिटेडने म्हटले आहे की, जहाजावर उपस्थित सर्व क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत आणि कोणीही जखमी झाले नाही. जहाल पुलाला कसे धडकले याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. यावेळी पटापस्को नदीचे तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली आहे. अशा स्थितीत अपघातानंतर नदीत पडलेल्या लोकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. कारण कमी तापमानामुळे लोक हायपोथर्मियाचे बळी ठरु शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com