Baba Vanga Predictions: बाबा वेंगाची 6 भाकितं ठरली खरी, भविष्यातील धोक्यांकडे जगाचे वेधले लक्ष; 2026 वर्षाबाबत सतावू लागली चिंता

Baba Vanga Predictions: बाबा वेंगा यांच्या क्षमतांचे निश्चित मूल्यांकन करणे आव्हानात्मक असले तरी, जगभरातील नागरिक आणि गणमान्य व्यक्तींनी त्यांच्याकडे सल्ला घेतला होता.
Baba Vanga Predictions
Baba VangaDainik Gomantak
Published on
Updated on

Baba Vanga Predictions: बल्गेरियाच्या दिवंगत भविष्यवेत्ती बाबा वेंगा (Baba Vanga) यांच्या भविष्यवाण्यांची अचूकता आणि गूढता जगभरातील लोकांसाठी नेहमीच आकर्षणाचा विषय राहिली आहे. अंधत्व असूनही, त्यांनी वर्तवलेल्या अनेक महत्त्वाच्या घटना भूतकाळात खऱ्या ठरल्यामुळे त्यांचे लाखो अनुयायी त्यांच्या प्रत्येक शब्दाचे गांभीर्याने विश्लेषण करतात.

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणी किती अचूक?

बाबा वेंगा (Baba Vanga) यांच्या क्षमतांचे निश्चित मूल्यांकन करणे आव्हानात्मक असले तरी, जगभरातील नागरिक आणि गणमान्य व्यक्तींनी त्यांच्याकडे सल्ला घेतला होता. त्यांच्या अनेक भविष्यवाण्या तोंडी कथांच्या रुपात असल्या तरी, त्यांच्या काही प्रमुख अंदाजांचे दस्तावेजीकरण झालेले आहे.

Baba Vanga Predictions
Baba Vanga Predictions: सर्वनाश होणार? बाबा वेंगा यांच्या 2023 च्या भाकिताने...!

2022 मधील सत्य: त्यांनी 2022 वर्षासाठी केलेल्या सात भविष्यवाण्यांपैकी तीन भविष्यवाण्या प्रत्यक्षात खऱ्या ठरल्या आहेत. मात्र, सायबेरियातील एका घातक विषाणूमुळे आणखी एका महासाथीचा (Pandemic) फैलाव होईल, ही त्यांची एक भविष्यवाणी खरी ठरु नये, यासाठी जगभरातील लोक प्रार्थना करत आहेत.

ज्या ऐतिहासिक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या

बाबा वेंगा यांनी वर्तवलेल्या आणि प्रत्यक्षात उतरलेल्या सात प्रमुख ऐतिहासिक भविष्यवाण्या खालीलप्रमाणे आहेत.

  1. युरोपमधील दुष्काळ आणि वणवे: बाबा वेंगा यांनी जगात भीषण दुष्काळ आणि पाण्याची तीव्र टंचाई जाणवेल, असे भाकीत केले होते. प्रत्यक्ष सत्य: ऑगस्ट 2022 मध्ये ब्रिटनमध्ये 1935 नंतरचा सर्वात मोठा दुष्काळ आणि पाण्याची टंचाई जाहीर झाली, ज्यामुळे युरोपात नैसर्गिक आपत्तींचा काळ सुरु झाला.

  2. ऑस्ट्रेलिया आणि जपानमध्ये पूर: त्यांनी आशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये विनाशकारी पूर येण्याची भविष्यवाणी केली होती. प्रत्यक्ष सत्य: जुलै 2022 मध्ये सिडनीमध्ये केवळ चार दिवसांत तिसरा मोठा पूर आला.

    9/11 चा दहशतवादी हल्ला: ही बाबा वेंगा यांच्या सर्वाधिक चर्चिल्या गेलेल्या भविष्यवाणीपैकी एक आहे. त्यांनी 1989 मध्ये कथितरित्या म्हटले होते, “भीती, भीती! स्टीलचे पक्षी अर्थात विमाने अमेरिकन ट्विन टॉवर्सवर हल्ला करतील.” प्रत्यक्ष सत्य: अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर 9/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात विमानांचा वापर करण्यात आला होता, ज्यामुळे टॉवर्स कोसळले.

Baba Vanga Predictions
Baba Vanga Prediction: बाबा वेंगा यांच्या भाकिताने पुन्हा वाढवली चिंता, 2023 बाबत धक्कादायक खुलासे!
  1. रशियातील अणु-पाणबुडी दुर्घटना (कुर्स्क): बाबा वेंगा यांनी 1980 मध्ये भविष्यवाणी केली होती की, ऑगस्ट 1999 मध्ये कुर्स्क 'पाण्याने भरुन जाईल आणि संपूर्ण जग त्यावर रडेल'. प्रत्यक्ष सत्य: ऑगस्ट 2000 मध्ये रशियन अणु-पाणबुडी कुर्स्क (Kursk) बॅरेंट्स समुद्रात बुडाली. या अपघातात 118 नौसैनिकांचा मृत्यू झाला होता.

  2. बराक ओबामा आणि डोनाल्ड ट्रम्प: त्यांनी एका अश्वेत व्यक्तीच्या अमेरिकेचा 44वा अध्यक्ष बनण्याबद्दल भविष्यवाणी केली होती. प्रत्यक्ष सत्य: बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष बनले. तसेच, त्यांनी ओबामांनंतर क्रांतीच्या काळात डोनाल्ड ट्रम्प कसे उत्तराधिकारी म्हणून उदयास येतील, हे देखील पाहिले होते.

  1. इंदिरा गांधींची हत्या (भारतासंदर्भातली भविष्यवाणी): 1969 मध्ये बाबा वेंगा यांनी इंदिरा गांधींना पाहून भाकीत केले होते, "हा पोशाख त्यांना नष्ट करेल." त्या पुढे म्हणाल्या होत्या, "धुराच्या आणि आगीच्या ज्वाळांमध्ये मला एक नारंगी-पिवळे वस्त्र दिसत आहे." प्रत्यक्ष सत्य: ज्या दिवशी त्यांच्या अंगरक्षकांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, त्या दिवशी इंदिरा गांधींनी भगव्या (केशरी-पिवळा) रंगाची साडी परिधान केली होती.

  2. सायबेरियातील घातक विषाणूची महामारी: 2022 साठी त्यांनी सायबेरियातील पर्माफ्रॉस्ट (Permafrost) वितळल्यामुळे एका भयानक विषाणूमुळे नवी महामारी येईल, अशी भविष्यवाणी केली आहे, जी अद्याप पूर्णपणे खरी ठरलेली नाही.

Baba Vanga Predictions
Baba Vanga Predictions: बाबा वेंगांची भारताबाबत भविष्यवाणी, 2023 मध्ये होणार मोठा विनाश!

आगामी काळातील धोक्याचा इशारा

2025 मधील महायुद्ध: बाबा वेंगा यांनी 2025 मध्ये युरोपातील देशांमध्ये मोठे युद्ध होण्याची शक्यता वर्तवली आहे, ज्यात अनेक मोठे देश सहभागी असतील. त्यांनी कोणत्याही देशाचा थेट उल्लेख केला नसला तरी, 2022 नंतर रशिया-युक्रेन आणि इस्त्रायल-हमास यांच्यातील संघर्ष पाहता त्यांची ही भविष्यवाणी गांभीर्याने घेतली जात आहे.

2026 मधील आर्थिक संकट: त्यांनी 2026 मध्ये जागतिक स्तरावर 'रोख रकमेचे संकट' (Cash Crisis) येईल, असे भाकीत केले आहे. या संकटामुळे 'सेफ ॲसेट' (Safe Asset) समजल्या जाणाऱ्या सोन्याच्या दरात अचानक आणि सतत वाढ होण्याची शक्यता आहे, ज्याचे संकेत बाजारात दिसू लागले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com