Fumio Kishida Slams China: जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी पीएलए वॉर ड्रिल दरम्यान बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागल्याबद्दल चीनची निंदा केली आहे. चीन तैवानच्या सभोवतालच्या समुद्रात आणि आकाशात युद्धाभ्यास करत आहे. टोकियोच्या म्हणण्यानुसार, पाच क्षेपणास्त्रे त्याच्या आर्थिक क्षेत्रात पडली आहेत. यावर जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा म्हणाले, ही एक गंभीर समस्या आहे जी आपल्या राष्ट्रीय सुरक्षा आणि आपल्या लोकांच्या सुरक्षेवर परिणाम करणारी आहे.
चीनच्या कारवायांवर जपानची नजर
जपानच्या संरक्षण मंत्रालयानेही क्षेपणास्त्र हल्ल्याचे फोटो शेअर केले आहे. या बाबत एक अहवालही सादर करण्यात आला आहे. अहवालात असे म्हटले आहे की, 'चिनी सैन्याने फुजियान प्रांताच्या किनारपट्टीवर अनेक क्षेपणास्त्रे डागली, त्यापैकी पाच जपानी हद्दीत पडली. चिनी सैन्याने डागलेल्या क्षेपणास्त्रांची संख्या 9 ते 11 सांगितली जात आहे.' चीनच्या कारवायांवर नजर ठेवत असल्याचेही जपानकडून सांगण्यात आले आहे.
चीन जपानवर नाराज आहे
जपान G-7 गटाचा भाग आहे. G-7 ने तैवानभोवती चीनच्या आक्रमक युद्ध कवायतीचा निषेध केला आहे. या निषेधामुळे संतापलेल्या चीनने जपानच्या परराष्ट्र मंत्र्यांमधील द्विपक्षीय चर्चा रद्द केली आहे. त्याच वेळी, चिनी अमेरिकन हाऊस स्पीकर नॅन्सी पेलोसीला विरोध केला असतानाही, जपानने पेलोसीच्या स्वागताची तयारी केली. जपानचे पंतप्रधान किशिदा यांची भेट घेतल्यानंतर पेलोसी यांनी आज टोकियो येथून पत्रकार परिषद घेतली आणि चीनविरोधात जोरदार भूमिका मांडली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.