Salman Rushdie Attacked: प्रसिध्द लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये हल्ला

Attack On Salman Rushdie: न्यूयॉर्कमध्ये एका कार्यक्रमादरम्यान प्रसिध्द लेखक सलमान रश्दी यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.
Salman Rushdie
Salman RushdieDainik Gomantak
Published on
Updated on

Salman Rushdie Attacked In US: न्यूयॉर्कमध्ये एका कार्यक्रमादरम्यान प्रसिध्द लेखक सलमान रश्दी (Salman Rushdie) यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. कार्यक्रमादरम्यान स्टेजवरच सलमान रश्दी यांच्यावर हल्ला करण्यात आला. भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक असलेले सलमान रश्दी गेल्या 20 वर्षांपासून अमेरिकेत राहत आहेत. सलमान रश्दी यांना त्यांच्या 'द सॅटॅनिक व्हर्सेस' या पुस्तकाबाबत धमक्या आल्या आहेत. या पुस्तकावर 1988 पासून इराणमध्ये बंदी घालण्यात आली होती. इस्लाम धर्माची निंदा केल्याचा आरोप रश्दी यांच्यावर करण्यात आला आहे.

दरम्यान, हल्लेखोराने धक्काबुक्की करण्यास सुरुवात केल्यानंतर रश्दी स्टेजवरुन खाली कोसळले. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ रश्दी यांना कसेतरी वाचवले.

Salman Rushdie
Sri Lanka Crisis: गोटाबाया राजपक्षेंना सोडावे लागले सिंगापूर, या देशात घेतला आश्रय

दुसरीकडे, 1980 च्या दशकात त्यांना इराणकडून (Iran) त्यांच्या लिखाणासाठी जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. रश्दी यांच्या ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ या पुस्तकावर 1988 पासून इराणमध्ये बंदी आहे. अनेक मुस्लिम याला ईशनिंदा मानतात. एका वर्षापूर्वी, दिवंगत इराणचे नेते अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी (Ayatollah Ruhollah Khomeini) यांनी रश्दींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणारा फतवा जारी केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Pakistan Independence Day Chaos Viral Video
Shehbaz Sharif War Threat To India
Congo Ebola Epidemic Death Toll 2000
America Double Murder Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com