Honey Trap Killing प्रकरणी 5 जण दोषी; ब्रिटनमध्ये गमावला होता भारतीयाने जीव

Honey Trap Killing Britain: गोहेल 22 जानेवारी रोजी क्रेग्स लिस्ट या वस्तू आणि सेवा देणार्‍या वेबसाइटद्वारे दोषींपैकी एका महिलेच्या संपर्कात होते.
Honey Trap Killing
Honey Trap KillingDainik Gomantak
Published on
Updated on

5 people convicted For Honey Trap Killing in Britain: ब्रिटनमधील हर्टफोर्डशायर येथे एका 44 वर्षीय भारतीय वंशाच्या व्यक्तीच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने पाच जणांना दोषी ठरवले.

या पाच जणांच्या टोळीत तीन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 23 जानेवारी 2023 रोजी विशाल गोहेल हा त्याच्या घरात मृतावस्थेत आढळला होता.

हनीट्रॅप

विशाल गोहेलला आधी हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवण्यात आलं होतं. यानंतर त्यांचे घर लुटून त्यांची हत्या करण्यात आली.

सेंट अल्बन्स क्राउन कोर्टातील ज्युरीच्या म्हणण्यानुसार विशाल गोहेलला महिलांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी फसवणूक करण्यात आली होती. हनीट्रॅप करून महिलेचे साथीदार तिला लुटण्यासाठी आले आणि त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला.

Honey Trap Killing
Chandrayan 3 | आमचे 45 ट्रिलियन डॉलर लुटले त्याचे काय? चांद्रयान 3 च्या प्रक्षेपणानंतर खोडसाळपणा करणाऱ्या ब्रिटिश नेत्याला भारतीयांनी सुनावले

शेजाऱ्यामुळे उघड झाला प्रकार

न्यायालयाला सांगण्यात आले की 22 जानेवारी 2022 रोजी विशाल गोहेल हा शेजाऱ्याला मृतावस्थेत आढळला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, शेजाऱ्याने विशा गोहेल यांच्या घरात प्रवेश केला असता गोहेल यांचे तोंड बांधलेले होते. ते अर्धमेल्या अवस्थेत जमिनीवर पडलेले दिसले. गोहेलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे पोस्टमॉर्टममध्ये स्पष्ट झाले.

Honey Trap Killing
Watch Video | खलिस्तानी हल्ल्यानंतर ‘वंदे मातरम’, ‘भारत माता की जय’ अन् ‘अखंड भारत झिंदाबाद’च्या घोषणांनी दणाणले भारतीय दूतावास

न्यायालयाने पाच जणांना दोषी ठरवले

फिर्यादी शार्लोट नेवेल केसी यांनी न्यायालयात सांगितले की, तीन महिला आणि तीन पुरुष कॅबमधून गोहेलच्या घरी आले होते. आधी घराची तोडफोड केल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणी न्यायालयाने पाच जणांना दोषी ठरवले. तर सहाव्या आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या पाचही जणांना 26 सप्टेंबर रोजी सेंट अल्बन्स क्राउन कोर्टात शिक्षा सुनावण्यात येईल, असे न्यायालयाने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com