पाकिस्तानातील पेशावरमध्ये शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी शक्तिशाली बॉम्बस्फोट झाला. यामध्ये 30 जणांचा मृत्यू झाला असून 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. (At least 30 people have been killed and more than 50 injured in a powerful bomb blast in Pakistan)
दरम्यान, लेडी रीडिंग रुग्णालयात 30 मृतदेह आणण्यात आल्याचे रुग्णालयातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. हा स्फोट कोचा रिसालदार परिसरात झाला आहे. पेशावरचे सीसीपीओ (Capital City Police Officer) इजाज अहसान यांनी पुष्टी करताना सांगितले की, स्फोटात एका पोलिसाचाही (Police) मृत्यू झाला आहे. लेडी रीडिंग रुग्णालयाचे मीडिया मॅनेजर असीम खान यांनी सांगितले की, आतापर्यंत 30 मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले आहेत.
तसेच, सीसीपीओने सांगितले की, प्राथमिक अहवालानुसार, दोन हल्लेखोरांनी शहरातील किस्सा ख्वानी मार्केटमधील मशिदीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि तिथे पहारा देत असलेल्या पोलिसांवर गोळीबार केला. ज्यात एका पोलिसाचा मृत्यू झाला होता. तर दुसरा गंभीर जखमी आहे. सीसीपीओने पुढे सांगितले की, हल्ल्यानंतर मशिदीत लोकांना लक्ष्य करण्यात आले आणि मोठा स्फोट घडवून आणला. या घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरात घबराटीचे वातावरण तयार झाले.
हल्ल्याची जबाबदारी कोणीही घेतली नाही
पोलीस अधिकारी वाहिद खान यांनी एपीला सांगितले की, कोचा रिसालदार मशिदीत नमाज अदा करण्यासाठी लोक जमले असताना हा स्फोट झाला. आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. प्रत्यक्षदर्शींपैकी एक शायन हैदर हा देखील मशिदीत प्रवेश करत असताना मोठा स्फोट झाला. त्यामुळे तो रस्त्यावर पडला. त्याने स्फोटाची माहिती देताना सांगितले, 'मी माझे डोळे उघडले आणि सर्वत्र धूळ आणि मृतदेह होते.' पेशावरच्या सीसीपीओच्या म्हणण्यानुसार, घटनास्थळावरुन पुरावे गोळा करण्यात आले आहेत. परंतु हा स्फोट कोणत्या प्रकारचा होता हे सांगणे कठीण आहे.
रुग्णालयात गोंधळ
लेडी रीडिंग रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात स्फोटानंतर एकच गोंधळ उडाला. अनेक जखमींना ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यासाठी डॉक्टरांना अडचणींचा सामना करावा लागला. या भागात अनेक बाजारपेठा असून शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी इथे मोठी गर्दी होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून जखमींना तातडीने वैद्यकीय मदत देण्याचे निर्देश दिले आहेत, असे पंतप्रधान कार्यालयाने (PMO) एका निवेदनात म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.