Russia-Ukraine Conflict
Russia-Ukraine ConflictDainik Gomantak

आणखी एका भारतीय विद्यार्थ्याला लागली गोळी, तातडीने उपचार सुरु

युक्रेनच्या राजधानी शहरात एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागल्याची माहिती समोर आली असून, त्या विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Published on

रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागल्याच्या काही दिवसांनंतर युक्रेनच्या राजधानी शहरात एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागल्याची माहिती समोर आली आहे तर, त्या विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Once again an Indian student has been shot and is undergoing treatment at a hospital)

Russia-Ukraine Conflict
'या' एडल्ट स्टारनं दिलं होत राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना चॅलेंज

माध्यमांशी बोलताना नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे राज्यमंत्री (MOS) जनरल व्हीके सिंग यांनी पोलंडच्या रझेझो विमानतळावर असताना ही माहिती दिली आहे.

जनरल (Retired) सिंग यांनी माध्यमांना सांगितले की, कीवमध्ये राहत असलेल्या एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागल्याची माहिती मिळाली आणि त्याला तात्काळ कीव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. "भारतीय दूतावासातील सर्वांनी याआधीच कीव सोडले पाहिजे, असे प्राधान्याने स्पष्ट केले होते. युद्धाच्या प्रसंगी बंदुकीची गोळी कोणाचाही धर्म आणि राष्ट्रीयत्व पाहत नाही," असेही ते यावेळी म्हणाले.

Russia-Ukraine Conflict
VIDEO: रशियाने रॉकेटवरुन हटवला अमेरिका अन् जपानचा ध्वज, भारतीय तिरंगा कायम

हे विद्यार्थी (Students) सध्या युक्रेनमधून युद्धग्रस्त देश सोडून भारतात (India) रक्षित परतण्यासाठी पोलंडच्या सीमेवर पोहोचण्याचा अतोनात प्रयत्न करत आहेत. चार केंद्रीय मंत्री, हरदीपसिंग पुरी, ज्योतिरादित्य एम सिंधिया, किरेन रिजिजू आणि जनरल (Retired) व्हीके सिंग युक्रेनला लागून असलेल्या देशांतील स्थलांतराच्या प्रयत्नांवर सातत्याने देखरेख करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com