पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांचा 'काश्मीरी' राग

नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सत्तेवर येताच काश्मीरचा जप सुरू केला.
Shehbaz Sharif
Shehbaz SharifDainik Gomantak
Published on
Updated on

एकीकडे भारत (India) पाकिस्तानशी (Pakistan) संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी सत्तेवर येताच काश्मीरचा जप सुरू केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) अभिनंदनावर प्रतिक्रिया देतानाही त्यांनी काश्मीरबाबत भाष्य केलं. शरीफ यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आणि नंतर म्हणाले की, राहिलेले वाद आपण शांततेने सोडवले पाहिजेत. तर जम्मू-काश्मीरचा वाद सोडता येणार नाही. (As soon as Prime Minister Shahbaz Sharif came to power he started chanting Kashmir)

Shehbaz Sharif
श्रीलंका 'परकीय कर्ज फेडू शकणार नाही', विदेशी सरकारांना केलं आवाहन

सत्ता हाती येण्यापूर्वीच त्यांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही. यानंतर पंतप्रधान होताच पंतप्रधान मोदींना संदेश देताना ते म्हणाले की, काश्मीर प्रश्न काश्मिरी जनतेच्या इच्छेनुसार सोडवायला हवा. त्यांनी आपल्या आधीच्या सरकारला शिव्याशाप देत जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर काहीही करता आले नाही, असे ही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी शरीफ यांना अभिनंदन पत्रही पाठवू शकतात, असे सांगण्यात आले आहे. तसेच दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर भर देखील दिला जाऊ शकतो. मात्र, दोन्ही नेत्यांमधील फोनवरील संभाषणाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

Shehbaz Sharif
भारतातून श्रीलंकेत पोहचला 11,000 मेट्रिक टन तांदूळ

पाकिस्तानमध्ये मोठ्या राजकीय गोंधळानंतर शाहबाज शरीफ पंतप्रधान झाले. इम्रान खान यांना त्यांच्या कार्यकाळाच्या मध्यावर राजीनामा द्यावा लागला. यापूर्वी इम्रान खान () यांनी राष्ट्रपतींकडे शिफारस करून संसद देखील बरखास्त केली होती. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले, सर्वोच्च न्यायालयाने संसद पुन्हा सुरू केली. अशा परिस्थितीत संसदेत कमी जागांमुळे इम्रान खान यांना खुर्ची सोडावी लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com