श्रीलंका 'परकीय कर्ज फेडू शकणार नाही', विदेशी सरकारांना केलं आवाहन

श्रीलंकेतील (Sri Lanka) आर्थिक संकट अधिक गडद होत चालले आहे.
Sri Lanka
Sri LankaDainik Gomantak
Published on
Updated on

श्रीलंकेतील आर्थिक संकट अधिक गडद होत चालले आहे. श्रीलंकन नागरिकांना वाढत्या महागाईचा सामना करावा लागत आहे. यातच आता संकटग्रस्त श्रीलंकेने मंगळवारी जाहीर केले की, 'आम्ही, $51 अब्ज डॉलरचे विदेशी कर्ज फेडू शकणार नाही.' श्रीलंकेला इंटरनेशनल मॉनिटरी फंडकडून (International Monitory Fund) बेलआउट पॅकेज (Bailout Package) मिळण्याची अपेक्षा आहे. श्रीलंकेच्या वित्त मंत्रालयाने म्हटले की, ''दक्षिण आशियाई कर्जदार देश आणि परदेशी सरकारे कर्जावर कोणतेही व्याज लावू शकतात किंवा श्रीलंकन रुपयांमध्ये आपले कर्ज परत घेऊ शकतात.'' (Sri Lanka has said it will not be able to repay 51 billion in foreign loans)

दरम्यान, श्रीलंकेची (Sri Lanka) आर्थिक स्थिती सातत्याने खालावत चालली आहे. देशावरील गंभीर आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी राष्ट्राला संबोधित करताना सांगितले की, 'लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था आणखी खलावत आहे. त्यामुळे परकीय गंगाजळीचा तुटवडा जाणवत आहे.'

Sri Lanka
भारतातून श्रीलंकेत पोहचला 11,000 मेट्रिक टन तांदूळ

राजपक्षे यांनी आपल्या भाषणादरम्यान अशा पैलूंवर प्रकाश टाकला ज्यामुळे देशाची अर्थव्यवस्था खराब झाली. यावेळी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी देशातील जनतेला सरकारविरोधी निदर्शने थांबवण्याची विनंती केली. त्याचबरोबर आर्थिक संकटावर मात करण्यासाठी सरकार चोवीस तास काम करत असल्याचे देखील राजपक्षे यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com